Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०९, २०१३

चिमूर क्रांती जिल्हयाच्या मागणीसाठी तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा

चिमूर/ प्रतिनिधी :- मागील ३७ वर्षापासून चिमूर क्रांती जिल्हयाच्या मागणीसाठी विविध आंदोलने सुरुच असून २००२ साली भव्य मोर्चाचे रुपांतर तहसिल जाळपोळ प्रकरणात झाली होती व त्यानंतरही ऐतीहासीक व स्वातंत्र्यापुर्व स्वातंत्र्याचा उपभोग घेणाèया चिमूर क्रांतीला जिल्हा घोषीत करण्यात यावे यासाठी विविध आंदोलन करण्यात आली. परंतु सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला व स्थानिक लोकप्रतिनिधींना जिल्हा करण्यात यश न आल्याने चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचा आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकला.

चिमूर जिल्हा कृती समितीव्दारे आयोजीत सर्वपक्षीय मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, सुनिल मैंद, अरुण लोहकरे, सुनिल दाभेकर, राजेंद्र कराळे, राजु लोणारे, सुधीर पंदीलवार, डॉ. दिलीप शिवरकर, जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजुकर, गजानन बुटके, सुधीर जुमडे, सौ. अथरगडे, सौ. वर्षा शिवरकर, सुमनताई qपपळापूरे, जि. प. सदस्या अल्का लोणकर, धनराज मुंगले, वसुधा नाकाडे, प्रदिप बंडे, संतोष महाकाळकार, जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे गुरुजी, सचिन पचारे, भाउराव दांडेकर आदी हजारों नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

मोर्चाची सुरुवात दुपारी १२ वाजता स्थानिक श्रीहरी बालाजी महाराज मंदिरासमोरुन मोर्चाला सुरुवात झाली. स्वातंत्र लढयात प्रथम स्वातंत्र्याची फळे चाखणाèया चिमूर क्रांतीभुमीत शहीदांना नमन करण्याकरीता तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरqसहराव, तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, सुशीलकुमार qशदे अनेक मंत्री व राज्यमंत्री यासह अनेक मंत्र्यानी या चिमूर भुमीत येवुन आश्वासने दिलीत. तर सध्या राज्यात व देशात काँग्रेसची सरकार असल्याने तसेच नुकतेच तेलंगणा राज्याची निर्मितीची घोषणा काँग्रेसने केल्याने विदर्भ राज्यासह चिमूर जिल्हयाच्या जुन्या मागणीला पुन्हा जनआंदोलनाचे रुप प्राप्त होत असून १ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत साखळी उपोषण व आज ९ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. चिमूरचे तहसिलदार निलेश काळे हे मोर्चाला सामोरे जावुन शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले. आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारच्या आश्वासनाने चिमूर परिसरातील जनतेत असंतोष खदखदत असून आंदोलन तिव्र करण्याचा मानस चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीने केला असून १३ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.