Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ११, २०१३

नव्या जिल्ह्यांची निर्मिती व्हावी

चंद्रपूर- विदर्भातील अकरा जिल्ह्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २ कोटी ३० लाख आहे. नागपूरमधून काटोल, अमरावतीमधून अचलपूर, यवतमाळमधून पुसद, बुलडाण्यातून खामगाव, चंद्रपूरमधून ब्रह्मपूरी व चिमूर, वर्ध्यातून आष्टी तर गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी या नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी आक्रमकपणे पुढे आली आहे. राज्यात युती शासनाच्या काळात १४ वर्षांपूर्वी गोंदिया व वाशीम या जिल्ह्यांची निर्मिती झाली. त्यानंतर एकही नवा जिल्हा अस्तित्त्वात आलेला नाही.
 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी विशेष परिमाण नसते. प्रशासकीय दृष्टीने सोईचे जावे म्हणून जिल्हा मुख्यालयापासून त्या जिल्ह्यातील गावांचे अंतर, लोकसंख्या, गावे, सुपिक जमीन, आर्थिक स्थिती हे घटक लक्षात घेतले जातात. एखादा भाग घनदाट जंगल किंवा माओवाद्यांच्या समस्यांनी प्रभावित असेल तर तेथे प्रशासकीय समन्वय हा मुद्दा महत्वाचा समजून छोट्या जिल्ह्यांची निर्मिती होते. 
छोटी राज्ये विकासासाठी अनुकुल असतात, क्षेत्र मर्यादित असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते असे म्हणत वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे. त्याच वेळी जिल्ह्यातील प्रशासन सुकर व्हावे म्हणून मोठ मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजनाचा प्रश्नाचे भिजत घोंगडे मात्र कायमच आहे. विदर्भाचाच विचार केला तर आठ नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीकडे जनता डोळे लावून बसली आहे.
तेलंगणा राज्य निर्मितीचा विषय ऐरणीवर आल्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला गती मिळाली आहे. छोटे राज्य प्रशासनासाठी उत्तम असतात असा युक्तिवाद केला जात आहे. त्याच वेळी विदर्भातील प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्यांकडे आणि त्यांच्या विभाजनाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांना महाराष्ट्राच्या राजधानीपेक्षा देशाची आणि छत्तीसगड व मध्यप्रदेशाची राजधानी जवळ आहे. यवतमाळ आणि गडचिरोली हे दोन जिल्हे असे आहेत की ज्यांचे क्षेत्रफळ गोव्यासारख्या राज्यापेक्षा अधिक असावे.
विदर्भातील अकरा जिल्ह्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २ कोटी ३० लाख आहे. नागपूरमधून काटोल, अमरावतीमधून अचलपूर, यवतमाळमधून पुसद, बुलडाण्यातून खामगाव, चंद्रपूरमधून ब्रह्मपुरी व चिमूर, वर्ध्यातून आष्टी तर गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी या नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी आक्रमकपणे पुढे आली आहे. राज्यात युती शासनाच्या काळात १४ वर्षांपूर्वी गोंदिया व वाशीम या जिल्ह्यांची निर्मिती झाली. त्यानंतर एकही नवा जिल्हा अस्तित्त्वात आलेला नाही.

मागण्यांचे निकष...

नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी विशेष परिमाण नसते. प्रशासकीय दृष्टीने सोईचे जावे म्हणून जिल्हा मुख्यालयापासून त्या जिल्ह्यातील गावांचे अंतर, लोकसंख्या, गावे, सुपीक जमीन, आर्थिक स्थिती हे घटक लक्षात घेतले जातात. एखादा भाग घनदाट जंगल किंवा माओवाद्यांच्या समस्यांनी प्रभावित असेल तर तेथे प्रशासकीय समन्वय हा मुद्दा महत्त्वाचा समजून छोट्या जिल्ह्यांची निर्मिती होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.