Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १९, २०१३

जोरदार पावसाची शक्यता

पूर्व विदर्भात वरुणराजा पुन्हा परतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गोंदिया, ब्रम्हपुरी, कुरखेडा येथे जोरदार पावसाची शक्यता आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमढा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सावली-चारगाव मार्गावर पाणी होते. त्यात सावलीहून चारगावकडे जाणारे चरणदास ढेकलू दरांजे (४०) हे वाहून गेले. त्यांना शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान , यंदाच्या पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एक जण वाहून गेला. गडचिरोली जिल्ह्यातील दोनशे एकर शेती धोक्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया , गोरेगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पुजारीटोला , कालीसरार व शिरपूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. संततधार पावसामुळे बाघ नदी व वैनगंगेला पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२०० एकरावर रेती , दगडाचा थर गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पावसाची नोंद सिरोंचा तालुक्यात झाली आहे. दरम्यान , २०० एकर शेतजमिनीवर चार फूट रेती आणि दगडाचा थर जमा झाला आहे.

सिरोंचा तालुक्यात बामणी , टेकडा , रोमपल्ली , जाफ्राबाद या भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नाल्यांमधून पाण्यासोबत वाळू आल्याने शेतात तब्बल तीन ते चार फुटाचा थर जमा झाला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी शेतीची पाहणी केली. शेतातील ही वाळू काढण्यासाठी मोठा खर्च येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.