चंद्रपूर दि.19- सिकलसेलसंबंधी 21 ऑगष्टला दुपारी 3 वाजता बचत साफल्य भवन चंद्रपूर येथे जनसुनावणी आयोजित केली आहे. बाल हक्क संरक्षण आयोग मुंबईचे सचिव अ.ना.त्रिपाठी हे या जनसुनावनीस उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधितांनी लेखी निवेदनासह व आवश्यक त्या पुराव्यासह 21 ऑगष्ट रोजी दुपारी 3 वाजता बचत साफल्य भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
21,22 व 23 रोजी संच मान्यता शिबीराचे आयोजन
चंद्रपूर दि.19- शिक्षण विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हयातील उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयाचे संच मान्यता शिबीराचे 21, 22 व 23 ऑगष्ट 2013 ला सरदार पटेल महाविद्यालय, गंजवार्ड चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पंचायत समितीनिहाय राहणार असून त्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. 21 ऑगष्ट रोजी पंचायत समिती मूल, भद्रावती, राजूरा, गोंडपिपरी व जिवती , 22 ऑगष्ट रोजी चिमूर, चंद्रपूर, बल्लारपूर, सिंदेवाही व नागभिड, तर 23 ऑगष्ट रोजी ब्रम्हपूरी, वरोरा, पोंभूर्णा, कोरपना व सावली या पंचायत समितीचे शिबीर असणार आहेत.
या शिबीरात जिल्हयातील अनुदानीत/विना अनुदानीत व कायम विना अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यानी संबंधित लिपीकासह दाखल खारीज रजिस्टर, टी.सी.फाईल, विद्यार्थी हजेरी रजिस्टर सन 2012-13 व 2013-14 व इयत्ता 11 वी ची मुल्यमापन पंजी 2012-13 व प्रपत्र फ ची माहिती व प्रपत्र अ, ब व क मध्ये माहिती DVB-TTSurekh या लिपीमध्ये तयार करुन हार्डकापीसह उपस्थित राहावे. हे मान्यता शिबीर या शैक्षणिक सत्रात फक्त एकदाच होत असल्याने कोणीही अनुपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच या संच मान्यता शिबीरात उपस्थित न झाल्यास नंतर आपले कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करुन देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावी असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.चंद्रपूर यांनी कळविले आहे.
शासकीय आरे सरीता बुथ केंद्राचे वाटप
चंद्रपूर दि.19- चंद्रपूर शासकीय दूध योजनेअंतर्गत सर्व शासकिय दूध वितरकांना या कार्यालयामार्फत चंद्रपूर व बल्लारशहा शहरात असलेल्या शासकिय दूध वितरकांना आरे सरीता पूर्णवेळ दूध विक्री केंद्र बूथ भाडे तत्वावर शर्ती व अटीच्या अधिन राहून वितरीत करण्यांत येणार आहे. तरी जे इच्छुक वितरक बूथ घेण्यास तयार असतील त्यांनी आपले बूथ मागणी विषयीचे अर्ज या कार्यालयात 23 ऑगष्ट 2013 पर्यंत सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची वितरकांनी नोंद घ्यावी असे शासकीय दूध योजना चंद्रपूर दूग्धशाळा व्यवस्थापक एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.