चंद्रपूर दि.02- चंद्रपूर जिल्हयात 1 ऑगष्ट 2013 रोजी अमरावती जिल्हयातून अप्पर वर्धा धरणातून तसेच लोअर वर्धा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वर्धा नदीचे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन तसेच इरई नदीवरील इरई धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपूर जिल्हयातील इरई व वर्धा नदीकाठावरील तालुक्यातील गावांमध्ये तसेच गोसीखूर्द धरण जि.भंडारा येथील सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीचे पाणी पातळीमध्ये झालेली वाढ तसेच इसापूर धरण जि.यवतमाळ येथील पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदीचे पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असून पैनगंगा नदी, वैनगंगा, वर्धा तसेच इरई नदी काठावरील तालुक्यातील नागरीकांनी 2 ऑगष्ट 2013 रोजी व पुढील कालावधीकरीता सतर्क राहावे.
चंद्रपूर शहरातील इरई नदीकाठावरील नागरिकांनी नदीचे वाढते जलस्तर लक्षात घेता ताबडतोब आपले घरातून महत्वाचे साहित्यासह सुरक्षित ठिकाणी प्रशासनाच्या मदतीने स्थलांतरीत होण्यास जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नदी व नाल्याचे वाहते पाण्यजवळ कुणीही जावू नये. तसेच जिल्हयातील कोणत्याही पुरप्रवण भागामध्ये पुराचे पाण्यात अडकलेल्या नागरीकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील दुरध्वनी क्रमांक 07172-251597 व टोल फ्रि क्रमांक 1077 यावर त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले.