अतिवृष्टीचा फटका; 93 हजार हेक्टरचे मोठे नुकसान; 546 गावे बाधित
चंद्रपूर - अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील एक लाख 35 हजार 902 हेक्टर शेतीला फटका बसल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून दिसून आले आहे. यापैकी तब्बल 93 हजार हेक्टरवरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
संततधार आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यात मालमत्तेसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जूनमध्ये झालेल्या पावसानंतर काहींनी दुबार पेरण्या केल्या होत्या. मात्र लागलीच जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस संततधार कोसळत असल्याने शेतीची मोठी हानी झाली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार ही हानी 40 ते 45 हजार हेक्टर इतकी असल्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीत शेतीची जबर आणि न भरून निघणारी हानी झाल्याची माहिती पुढे आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार 92 हजार 902 हेक्टरमधील पिकांची पन्नास टक्क्यांहून अधिक हानी झाली आहे. सध्याचा पाऊस बघता केवळ धानाची पुनर्लागवड शक्य आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागानेही प्राथमिक पाहणीनंतर 215 किलोमीटरच्या रस्त्यांना हानी झाल्याचा अंदाज काढला आहे. यात 21 छोट्या आणि मोठ्या पुलांचा समावेश आहे. या रस्त्यांची तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्याने विभागाने 50 कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
जिल्ह्यात बाधित गावांची संख्या 546 असून, एकूण 12 जणांचे बळी केले आहे. पावसामुळे अंशत: 3849 व पूर्णत: 190 घरांचे नुकसान झाले आहे. घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अंमलनाला, लभानसराड, पकड्डीगुडम, डोंगरगाव व दिना प्रकल्प 100 टक्के भरले असून, आसोलामेंढा धरण 59 टक्के भरले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान क्षेत्र (हेक्टर) पीक - 50 टक्क्यांपेक्षा अधिक - 50 टक्क्यांपेक्षा कमी
धान (भात) - 18,600 - 7,850
कापूस - 25,454 - 10,201
तूर - 7,378 - 1,907
सोयाबीन - 37,726 - 19,482
इतर पिके - 3,744 - 351
एकूण - 92902 - 39,791
132639
तालुका : बाधित गावे : नुकसान क्षेत्र (हेक्टर) चंद्रपूर : 42 : 2,200
वरोरा : 28 : 1,883
भद्रावती : 37 : 7,002
चिमूर : 142 : 6,094
ब्रह्मपुरी : 140 : 7,011
नागभिड : 3 : 18
राजुरा : 65 : 6,000
कोरपना : 22 : 8,500
मूल :8 : 272
गोंडपिंपरी : 39 : 3,948
बल्लारपूर :15 :2,645
पोंभुर्णा : 71 : 700
सावली : 3 : 150
चंद्रपूर......442.....02
बल्लारपूर......34....26
गोंडपिंपरी.....175...14
पोंभुर्णा.......65....02
मूल......61.....02
सावली.....03...00
वरोरा....928....62
भद्रावती....754....71
चिमूर.....868.....00
ब्रह्मपुरी.....133....02
सिंदेवाही....59....00
नागभिड.....151...00
राजुरा.....242....07
कोरपना....60....02
जिवती.....56....00
तालुकानिहाय पावसाचा फटका बसलेल्या गावांची संख्या चंद्रपूर 39, बल्लारपूर 22, गोंडपिंपरी 52, पोंभुर्णा 25, मूल 27, सावली 1, वरोरा 54, भद्रावती 91, चिमूर 82, ब्रह्मपुरी 38, सिंदेवाही 18, नागभिड 32, राजुरा 45, कोरपना 18, जिवती 2, एकूण 556.
तालुकानिहाय कुटुंबांचे स्थानांतरण चंद्रपूर 444, बल्लारपूर 92, पोंभुर्णा 60, वरोरा 365, मूल 2, एकूण 963
तालुकानिहाय मृत्यू (अतिवृष्टी, वीज) चंद्रपूर 3, बल्लारपूर 2, भद्रावती 2, चिमूर 2, ब्रह्मपुरी 3, एकूण 12.
एक जून ते 25 जुलै दरम्यानचा तालुकानिहाय पाऊस (मि.मी.) चंद्रपूर 1395, बल्लारपूर 1058, गोंडपिंपरी 1122, पोंभुर्णा 1031, मूल 1006, सावली 827, वरोरा 1306, भद्रावती 1098, चिमूर 1093, ब्रह्मपुरी 1252, सिंदेवाही 868, नागभिड 930, राजुरा 1063, कोरपना 1156, जिवती 1115, सरासरी 1088.