Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून ०९, २०१३

चंद्रपुरात बोगस पदव्यांचा उद्योग

दीड ते दोन लाखांत पीएचडी, एमबीए, बीईच्या पदव्या


चंद्रपूर : औद्योगिक, व्यवसायिक आणि विविध नामांकीत कंपन्यांसह महाविद्यालयात नोकरी मिळविण्यासाठी दीड ते दोन लाखांत पीएचडी, एमबीए, बीईच्या पदव्या विक्रीचा उद्योग सुरू असल्याची माहिती आहे. स्थानिक बंगाली कॅम्प मार्गावरील गुलशन प्लाझामध्ये ही अकॅडमी असून, तिवारी नामक परप्रांतिय या पदव्यांची विक्री करीत आहे. त्याने आतापर्यंत अनेकांना गंडविले आहे.
अवघ्या दीड ते दोन लाखांत पीएचडी खरेदी केलेल्या दहा ते बारा प्राध्यापकांवर कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर पदव्यांचा हा उद्योग उघड झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सीएमजे विद्यापीठातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे २५ हून अधिक पदवीधरांनी अशा स्वरूपाच्या पदव्या खरेदी केल्या आहेत. वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक qकवा सहायक प्राध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण तसेच नेट वा सेट परीक्षा उत्तीर्ण असावे लागते. नेट qकवा सेट परीक्षा उत्तीर्ण नसल्यास पीएचडी असावी लागते. साधारणपणे पीएचडी पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागतो तसेच भरपूर वेळ द्यावा लागतो. तथापि, काही कामचुकारांनी या संशोधनकार्यास ङ्काटा देत मेघालयमधील सीएमजे विद्यापीठाकडून दीड ते दोन लाखांत पीएचडी पदवी खरेदी करण्याचा शहाणपणा केला. या विद्यापीठात दीड qकवा दोन लाख दिल्यानंतर एक ते दीड महिन्यात संशोधनकार्य पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जात होते. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. हा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, राज्य शासनाने  तडकाङ्कडकी एक परिपत्रक जारी करून अशा प्राध्यापकांच्या सेवा संपुष्टात आणण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच सर्व संशयित पीएचडी प्रमाणपत्र आणि संशोधनकार्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अवघ्या दीड ते दोन लाखांत पीएचडी मिळत असल्याने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २० ते २२ पदवीधरांनी सीएमजे विद्यापीठाकडे पैसे भरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी दहा ते बारा पदवीधरांना प्रमाणपत्र मिळायचे आहे. त्यामुळे या पदवीधरांना मोठा आर्थिक ङ्कटका बसणार आहे. चंद्रपूर शहरातील काही नामांकित महाविद्यालयांत सध्या अंशकालीन म्हणून कार्यरत प्राध्यापकांचाही यात समावेश आहे. वेतनश्रेणी वाढीसाठी तीन ते चार कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनीही बोगस पीएचडी मिळविली आहे. यापैकी दोन शिक्षक बारावीच्या शिकवणीसाठी मप्रसिद्धङ्क आहेत.


चंद्रपुरातील सीटीपीएस, बिल्ट, एमईएल, सिमेंट कंपन्या आणि वेकोलित पदोन्नती आणि नोकरी मिळविण्यासाठी सीएमजे विद्यापीठाकडून पदव्या घेतल्या आहे. या सर्व पदव्या बोगस असून, दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.