चंद्रपूर दि.09- जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय कार्यालय व न्यायालये यांचेसमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे अनुसूची 1 मधील अनुच्छेद 4 अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यांत आलेले आहे.
या कामाकरीता जनतेने जनरल स्टॅम्पचा वापर करु नये व चंद्रपूर जिल्हयातील व अधिनस्त असलेल्या सर्व तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी जनतेला ही बाब अवगत करुन देण्याचे करावे तसेच या कामासाठी मुद्रांकसाठा घेवू नये याबाबतची जनतेने व सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी नोंद घ्यावी असे कोषागार अधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.