चंद्रपूर शहरातील सिव्हील लाईन्स भागातील बिग सिनेमा चित्रपटगृहाच्या समोरील रेल्वे रुळांवर रात्री उशिरा २ मुलींचे मृतदेह आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. विद्या वरारकर, वृषाली वरारकर अशी त्यांची नवे आहेत रात्री उशिरा रामनगर व रेल्वे पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रवाना केले असून हा अपघात , हत्या कि आत्महत्या याविषयी चर्चांना पेव फुटले आहे.
चंद्रपूर मुख्य रेल्वे स्थानकापासून नागपूरकडे जाणा-या रेल्वे रुळांवर स्थानकापासून ५०० हून कमी मीटर अंतरावर रेल्वे रुळांच्या मधोमध २ मृतदेह पडून असल्याची माहिती एका रेल्वे चालकाने चंद्रपूर स्थानकाला दिली. यावरून रामनगर पोलीस व रेल्वे पोलीस यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून हे मृतदेह शोधले. मार्गाच्या मधोमध २० ते २५ वर्षे वयोगटातील २ मुलींच्या मृतदेहावर पंजाबी सूट असून त्यांच्या शरीराचा कुठलाही भाग रेल्वेची धडक दिल्याने मोडल्याच्या खुणा नाहीत. शिवाय रुळांच्या मधोमध हे मृतदेह ठेवल्यासारखे दिसून येत असल्याने हे मृतदेह हत्या करून आत्महत्या अथवा अपघाताचा देखावा केल्याचे प्रथम दर्शनी आढळून येत आहे. पोलिसांनी हे मृतदेह आपल्या ताब्यात घेत चंद्रपूर सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले आहेत. दरम्यान हा अत्यंत वर्दळीचा Grand Trunk रेल्वे मार्ग असल्याने या मार्गावर रेल्वे गाड्यांची मोठी ये-जा असते.. दरम्यान पोलिस सर्व बाजूनी तपास करत आहेत.