चंद्रपूरच्या कलावंतांचे एक पाऊल पुढे
चंद्रपूर, : चित्रपटनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या चंद्रपूरच्या काही हौशी तरुणांनी मतेरा जुनूनङ्क या qहदी चित्रपटाची निर्मिती केली. गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान त्यांनी चित्रीकरण केले आणि तीन मे रोजी त्याचा पहिला शो चंद्रपुरात सादर केला. धेय्यवेड्या या तरुणांनी दाखविलेली ही qहमत वाखाणण्याजोगी असून, भविष्यात चंद्रपूरचे नाव सिनेक्षेत्रातही उंचावेल, अशी किमया करून दाखविली आहे. निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि चित्रीकरणाचे स्थळ सारेच चंद्रपूरचे. मात्र, चित्रपटाची मांडणी पूर्णता: दाक्षिणात्य आहे. चंद्रपुरातील स्थानिक माणसे मराठीमिश्रीत qहदी बोलतात. अगदी हीच भाषा कलावंतांच्या तोंडी असून, ज्येष्ठ कलावंतांची कोणतीही नकल न करता उपजत असलेल्या गुणातून त्यांनी कला सादर केली.
कथानक
मतेरा जुनून या चित्रपटाची मांडणी सस्पेन्स आहे. चित्रपटातील नायक राज (योगेशकुमार) हा सोनाली (रूपाली डोंगरे)चा बालपणीचा मित्र. हे दोघेही जमीनदाराची मुले असतात. त्यांची शेती हडप करण्यासाठी मल्लारी (रवी धकाते) दोन्ही कुटुंबास ठार मारतो. जमिनीची वारसदार सोनाली असल्याने मल्लारी तिला १८ वय होईपर्यंत पालनपोषण करावे लागते. खुनाच्या घटनेपासून हे दोघेही दुरावतात आणि राज हा अनाथ होतो. बाईकवर स्टंटबाजी करणे त्याला आवडते. दुसरीकडे सज्ञान झालेल्या सोनालीला मल्लारीचा खरा चेहरा कळतो आणि ती त्यातून सुटका करण्यासाठी एका मित्राची मदत घेते. याचवेळी तिला राजविषयी कळते आणि त्याला मिळविण्यासाठी ती प्रयत्न सुरू करते. याच दरम्यान स्टेडियमवर खेळताना ङ्कूटबॉलमुळे एक बालक गंभीर जखमी होतो. त्याच्या उपचारासाठी १५ लाखांची गरज असते. त्याचा जीव वाचविण्यासाठी राजकडे पैसे नसतात. तेव्हा सोनालीचा मित्र राजला एका अटीवर पैसे देऊ करतो. मात्र, ती अट असते सोनालीला मआय लव्ह यूङ्क म्हण्याची. मल्लारीच्या बंगल्यातील तगडी सुरक्षा भेदून सोनालीला तो प्रपोज करून पळवून नेतो. मात्र, पळून जाण्याचा बेत सोनालीच्याच मनातील होता, हे राजच्या लक्षात येत नाही. जेव्हा जखमी झालेल्या बालकाच्या उपचारासाठी सोनालीनेच पैसे दिले आणि मआय लव्ह यूङ्क म्हणण्याची कल्पनाही तिची असल्याचे लक्षात आल्यावर राजचे डोळे उघडतात. पण, सोनालीला ठार मारून जमिनीचे कागदपत्रे मिळविण्यासाठी मल्लारीचे प्रयत्न सुरू असतात. त्यात सोनालीचा एक मित्र मारला जातो आणि मृत्यूपूर्वी त्याने राजला बालपणी झालेल्या दोघांच्याही आई-वडिलांच्या खुनाचे रहस्य सांगतो. तेव्हा राजला कळते की सोनाली ही बालपणीची सोनू असल्याचे. मग, हे दोघेही मिळून मल्लारी आणि त्याच्या गुंडांना संपवितात.
चित्रपटात चंद्रपूर दर्शन
संपूर्ण चित्रीकरण चंद्रपुरात झालेला हा पहिलाच चित्रपट. यात जटपुरा गेट, जुना वरोरा नाका, पोलिस मुख्यालय, जुनोना तलाव, दाताळा रोड, जयश्रीया लॉन, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी स्थळे दिसतात. बाईक स्टंटसाठी दाताळा मार्गावर नव्याने होत असलेल्या गुळगुळीत रस्त्याची निवड करण्यात आली. जुनोना येथील निसर्गरम्य तलाव आणि जंगलसुद्धा या चित्रपटात दिसते.
टाईमपास
कोणताही चित्रपट म्हटला की विनोद असतोच. त्याशिवाय प्रेक्षकांना मजा येत नाही. या तेरा जुनूनमध्ये मयू. आर क्रेझीङ्क अशी डॉयलाग मारणारा डॉन्स मास्टर हसायला लागतो. सडपातळ बांधा, सावळा रंग आणि टक्कल अशी त्याची व्यक्तिरेखा साकारण्यात आली आहे. मराज, ब्लडी राज....अॅक्शन कम ङ्काइट जादाङ्क ही नायकाच्या तोंडून निघणारी डायलॉग वारंवार ऐकायला मिळते. खलनायक मल्लारीदेखील तेवढाच प्रभावीशाली दाखविलेला आहे. एकूणच चित्रपटात विनोद, प्रेम आणि थरारही आहे. चित्रपटातील गाणी आणि संगीत साजेसा आहे.