Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १५, २०१३

शेतीच्या हिस्से वाटणीचा वाद : भावाची हत्त्या


वरोरा- शेतीचा हिस्सा मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन भावांनी संगनमत करून तिसर्‍या भावाला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या शेगाव (खु) गावात काल अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी असलेल्या दोनही भावांना अटक केली आहे.
शेगाव (बु.) येथील सूर्यकांत मधुकर दोहतरे (३५), सुनील मधुकर दोहतरे (३८) व अनिल मधुकर दोहतरे (४0) हे आपापल्या कुटुंबीयासह वेगळे राहतात. मात्र ते वडिलोपाजिर्त शेती एकत्रित करीत होते, १३ मे रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास अनिल दोहतकरे याने त्याचा लहान भाऊ सूर्यकांत व सुनिल या दोघांना शेतीचा हिस्सा मागितला. यावरून तिघाही भावांत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सूर्यकांत व सुनील या दोघांनी अनिलला लाकडी फळीने मारहाण केली. त्यात अनिल गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. मृतक अनिलची पत्नी वनिता दोहतरे हिने शेगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी मृताचे बंधू सूर्यकांत दोहतरे व सुनिल दोहतरे यांच्याविरुद्ध भादंवि ३0२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या घटनेचा तपास शेगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेशकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिलीप सूर करित आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.