चंद्रपूर दि.09- बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेली निलीमा पंढरी कोटरंगे हिच्या नातेवाईकांना उपसंचालक (बफरझोन) कल्याणकुमार यांच्या हस्ते 4 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही आर्थिक मदत शासन निर्णयानुसार देण्यात आल्याचे वनविभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
12 एप्रिल रोजी बिबटयाच्या दृर्दैवी हल्ल्यात चोरगाव येथील निलिमा पंढरी कोटरंगे ही मुलगी मृत झाली. मृत मुलीच्या वारसांना तातडीची मदत 10 हजार रुपये देण्यात आली होती. शासन निर्णयानुसार मृत व्यक्तीच्या कुटूंबियास 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची तरतूद असल्यामुळे उर्वरित रक्कम 4 लाख 90 हजार रुपये 8 मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचे उपसंचालक (बफर) पी.कल्याणकुमार यांचे हस्ते देण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) ए.एन.तिखे, पी.के. गंटावार, गणपत मोहुर्ले, चोरगावचे पोलिस पाटील यांचे उपस्थितीत मृत मुलीची आई श्रीमती सिंधुबाई पंढरी कोटरंगे चोरगांव यांना मदतीचा धनादेश सूपूर्द करण्यात आला.