Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १७, २०१३

१४ वर्षीय मुलीचा मृत्यू


21 दिवसात 7 बळी
चंद्रपूर- पासून सुमारे १८ किमीवरील अंतरावर असलेल्या पायली भटाळी गावातील प्रीती बंडू काटकर ही मुलगी सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या शेतात गेली होती. तिथे एका रानटी प्राण्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरातील हा सातवा बळी असून सततच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची कुणकुण लागताच सगळे गावकरी शेतावर धावले. वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली.
ताडोबा येथील प्रथम झोनमधील चोरगाव येथे एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडे सात ते साडे आठच्या दरम्यान, सिंधुबाई पांढरी कोटरंगे ही महिला आपली मुलगी निलीमा सोबत मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष ५८९ मध्ये मोहफुले गोळाकरण्यासाठी गेली. आपले काम करत असताना बेसावध असणा-या दोघींवर एका बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात निलीमा ही जागीच ठार झाली तर तिची आई सिंधूबाई गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर परिसराती नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बुधवारी आडेगाव येथील घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण ठार झाले होते, तेथून हा परिसर केवळ तीन किमी अंतरावर आहे. त्या घटनेनंतर एक बिबट जेर बंद झाला होतापण गेल्या १६ दिवसात बिबट व वाघाच्या हल्यात ठार झालेल्यांची संख्या आता सहावर जाऊन पोहोचली आहे. वन्य प्राण्यांचे वाढलेले हल्ले लक्षात घेऊन वन विभागाचे कर्मचारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांची सतत गस्त आहे. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या दोघांचा जीव घेणाèया हल्लेखोर बिबट्याला गुरुवारी वनविभागाने जेरबंद केले.चंद्रपूरलगत असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अडेगाव येथील तुकारामधारणे हे आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी अगरझरीला आले होता. परत जात असताना झाडाखाली मोहङ्कुले पडलेली दिसली. ती वेचण्यासाठी तो झाडाखाली जाताच त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना अगरझरी आणि अडेगावच्या लोकांना माहीत झाल्यावर लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याच अडेगावातील मालाबाई मुनघाटे ही ६५ वर्षीय वृद्ध महिलाही घटनास्थळाकडे येत होती. घटनास्थळापासून ५० मीटर अंतरावर ती असतानाच झाडावर चढलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. ती जोरानेqकचाळली. घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर ती असल्याने लोकांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तिचा बळी घेतला होता. लोकांची गर्दी बघून बिबट्याने जंगलात धूम ठोकली. एकाच रस्त्यावर दोन तासांच्या अंतराने एकाच बिबट्याने दोघांचा बळी घेतल्याने लोकांमध्ये मोठा असंतोष पसरला होता. त्यामुळे वनाधिकाèयांनी बिबट्याची शोधमोहिम राबवून जेरबंद करण्यासाठी पावले उचलली. गुरुवारी वनाधिकारी राऊत यांनी पिंजरा लावलेल्या ठिकाणी पाहणी केली असता, बिबट जेरबंद झाल्याची बाब उघडकीस आली.



   तारीख      :  गाव :        तालुका :         मृताचे नाव
२४ मार्च : पालेबारसा :  सावली :  अनसूया शेंडे
६ एप्रिल  सादागड,        सावली : धृपदाबाई गजानन मडावी
१० एप्रिल : आगरझरी :   मूल :   तुकाराम धारणे आणि मालनबाई मुनघाटे
११ एप्रिल : पाथरी :    सावली :  ललिता आनंदराव पेंदाम
१२ एप्रिल : चारगाव :  भद्रावती :निलिमा कोटरंगे 
१७ एप्रिल : पायली भटाळी गावातील प्रीती बंडू काटकर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.