Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १७, २०१३

जन्मदात्याने पोटच्या दोन मुलांना ठार मारले


भंडारा- पत्नीशी झालेल्या वादातून संतप्त जन्मदात्याने पोटच्या दोन मुलांना मंगळवारी दुपारी गावानजीकच्या तलावात फेकून ठार मारल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्‍यातील गर्रा बघेडा घडली असून, आज (बुधवार) उघडकीस आली आहे.  
पोलिसांनी बुधवारी सकाळी सहा वाजता तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या घटनेची माहिती होताच परिसरातील गावांतील नागरिकांची तलावाच्या काठावर मोठी गर्दी जमली. आरुषी जितेंद्र नेवारे (वय दीड वर्षे) व आयुष जितेंद्र नेवारे (वय तीन वर्षे) अशी मृत बालकांची नावे आहेत. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी आरोपी पिता जितेंद्र नेवारे याला अटक केली आहे.
मध्यप्रदेशातील राणी मोहगाव (जि. बालाघाट) येथील मूळचा रहिवासी असलेला जितेंद्र सुरजलाल नेवारे (वय 28) याचे गर्राबघेडा येथील सुरेखासोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांनंतर जितेंद्र रोजगाराच्या शोधात सासुरवाडी बघेडा येथे आला. तो वर्षभरापासून तेथेच एका वीटभट्टीवर मजुरीचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यावरून पती-पत्नीचे दोन-चार दिवसांनंतर भांडण होत होते. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास जितेंद्र दारूच्या नशेतच मुलांना आणण्यास अंगणवाडी केंद्रात गेला. आरुषी व आयुष या चिमुकल्यांना सोबत घेऊन तो तलावाकडे गेला. दुपारी एकच्या सुमारास त्याने चिमुकल्यांना तलावात फेकून दिले. त्यानंतर तो घरी परतला. मात्र, त्याच्यासोबत मुले दिसली नसल्याने सुरेखाने शोध घेऊन गोबरवाही पोलिसांत तक्रार केली. कुटुंबीय व पोलिस रात्रभर चिमुकल्यांचा शोध घेत होते. मात्र, मद्यपी जितेंद्र काहीच सांगत नव्हता. अखेर बुधवारी पहाटे त्याने मुलांना तलावात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले.
दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसरच्या सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी या आरोपी पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करीत आहेत. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.