Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी २३, २०१३

वनपालास १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

चंद्रपूर, दि.२३ (प्रतिनिधी):
गुप्तधन शोधणाèया व्यक्तीस कासव विकण्याच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देवून संबंधितांकडून लाच मागणारा चंद्रपूर वनविभागाच्या कार्यालयातील वनपाल सुभाष निवृत्ती कांबळे यास येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्ष १० हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यास अटक करण्यात आली असून, ही कारवाई शनिवार, २३ फेब्रुवारी रोजी बंगाली कॅम्प परिसरातील मच्छी मार्केट येथे झाली. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ माजली आहे.
येथील सरकार नगर परिसरातील सुनील नटराजन भैसारे (२३) हे बेरोजगार असून, सध्या समाजसेवक म्हणून कार्य करतात. एक व्यक्ती गुप्तधन शोधणाèयास त्याच्याजवळ असलेला कासव २ लाख रुपयात विकणार असल्याची माहिती सुनील भैसारे यांना मिळाली. भैसारे यांनी याबाबत  चंद्रपूर वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी आक्केवार यांना कळविले. भैसारे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आक्केवार यांनी आपले सहकारी वनपाल सुभाष कांबळे, बोबडे यांच्यासह साखरवाही येथे जावून कारवाई केली.
या कारवाईनंतर वनपाल कांबळे यांनी या प्रकरणात तुम्हालाही आरोपी बनवतो, अशी धमकी सुनील भैसारे यांना दिली व कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. कांबळे यांच्याकडून वारंवार होत असलेल्या पैशाच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या भैसारे यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कांबळे याच्याविरूद्ध तक्रार केली.
 यानंतर कांबळे यांना येथील बंगाली कॅम्प परिसरातील मच्छी मार्केटमध्ये शनिवारी १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाèयांनी या परिसरात सापळा रचला. ठरल्यानुसार भैसारे यांच्याकडून १० हजाराची लाच स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या अधिकाèयांनी वनपाल सुभाष कांबळे याला रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर येथील पोलिस उपायुक्त निशिथ मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेश शिरसाठ, पोलिस निरीक्षक नरेंद्र वानखेडे, मदन पुराणीक, संदीप वासेकर, मनोज पिदुरकर, अरूण हटवार, शंकर मांदाडे, प्रकाश ईखारे यांनी केली. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.