Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २७, २०१३

वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे आंदोलन आणखी तिव्रः



8 मार्च ला मुंबईत प्राध्यापकांचे जेलभरो

चंद्रपूरः संपूर्ण महाराश्ट्रात एकीकडे वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक परिक्षांवरील बहीश्कारात समाविश्ठ आहेत, तर दुसरिकडे कनिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनीही परिक्षांवरील बहीश्कार पुकारलेला आहे. आता वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी परिक्षांवरील बहीश्काराला आनखी तिव्र करीत येत्या 8 मार्च ला मुंबईत आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन आयोजीत केले आहे. या जेलभरो आंदोलनात राज्यभरातील 15 हजार वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक समाविश्ठ होत असल्याने आता परिक्षा, निकाल, तसेच तासीकांबाबतचे प्रष्न आनखीनच बिकट होन्याची षक्यता वर्तवली जात आहे.
महाराश्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) ने पुकारलेल्या या प्राध्यापकांच्या परिक्षांवरील बहिश्काराला राज्यभरातुन भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, राज्यभरात तब्बल 30 हजार प्राध्यापक बहीश्कारावर आहेत. मुंबई, पुणे तसेच नागपुर विभागातही प्राध्यापक मंडळी त्यांच्या आधीच्याच प्रलंबीत मागण्यांसाठी दुसÚयांदा बहीश्कारावर गेलेली आहेत तर दुसरीकडे महाराश्ट्र षासन आंदोलनाला दंडुकेषाहीने दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राध्यापक व षासनाच्या या लढाइत कोण बाजी जिंकेल हे आताच सांगणे कठीन असले तरी विद्यार्थी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या भरडला जाईलच हे नक्की. या आंदोलनाची विषेशतः म्हणजे प्राध्यापकांचा षिकवण्यावर बहीश्कार नसल्याने, राज्यभरात महाविद्यालयीन वर्ग नियमित सुरू आहेत, त्यामुळे विद्याथ्र्यांचा रोश प्राध्यापकांकडे नाही.
आधीच्या संपात मंजुर झालेल्या तेसच केंद्राकडून आर्थीक रूपात आधीच मिळालेल्या गोश्टी महाराश्ट्रात लागू करा या मागणीसाठी प्राध्यापकांनी बहीश्काराचे यंत्र हातात घेतले आहे. तर दुसरीकडे महाराश्ट्र षासन वेळकाढूपणाचे तसेच (बे)कायदेषीर मार्गाचा वापर करीत आहे. एका आंदोलनात मंजुर झालेल्या मागण्या लागु करण्यासाठी दुसरे आंदोलन करण्याची वेळ महाराश्ट्रासारख्या षिक्षणप्रिय राज्यात षिक्षकांवर आलेली आहे, आणी यासाठी षिक्षक जेलभरो आंदोलन करीत असतिल तर षासन किती निगरगठ्ठ झाले आहे हे याचे उदाहरण आहे. यावेळचे प्राध्यापकांचे आंदोलन जुन्याच मागण्यांसाठी म्हणजेच  19 सप्टेंबर 1991 ते 3 एप्रिल 2000 या कालावधित नोकरीस लागलेल्या प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्यासाठी, 1 जानेवारी 2006 ते पुढील 5 वर्शांची नविन वेतनश्रेनीच्या थकबाकीपोटी आधीच केंद्राकडून राज्याला 80 टक्के मिळालेली रक्कम उचल्यण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी, तसेच युजीसी ने नेट सेट ग्रस्त प्राध्यापकांना 16 आॅगश्ट 2011 तसेच 26 आॅगश्ट 2011 च्या पत्रान्वये मुक्त केले असतांना त्याबाबत कोणतीही कार्यवाही महाराश्ट्र षासन करीत नसल्याबाबत आहे. प्राध्यापकांच्या प्रतिनिधींच्या याबाबत बÚयाच बैठका उच्च षिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यासोबतही झाल्या आहेत, यावर षासनाने विविध आष्वासने दिली आहेत, परंतु चर्चेत झालेल्या गोश्टींवर व प्रत्यक्षतः लेखी आष्वासनांवरही महाराश्ट्र षासन अमल करीत नाही त्यामुळे बहीश्कार, जेलभरो यापेक्षाही मोठया आंदोलनाषिवाय पर्याय नाही असे प्राध्यापक प्रतिनिधींचे म्हणने आहे.
       आता राश्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या मार्फत प्राध्यापकांना पेपर सेटींग, माॅडरेषन ची पत्रे आलेली आहेत. पण प्राध्यापकांनी या सर्वांना पुर्णतः नाकारले आहे, इतकेच नव्हे तर विद्यापीठांच्या प्रात्यक्षीक परिक्षाही नाकारल्या आहेत. दुसरीकडे नागपुर विद्यापीठाने वेळेवर निकाल लावण्याच्या दृश्टीकोणातून वर्तमानपत्रात जाहीराती देवून ज्यांना थोडाफार अनुभव असेल अषाही प्राध्यापकांना या कामावर बोलावण्याची विनंती केली आहे, याषिवाय अनेक वर्शांपूर्वी निवृत्त झालेले तसेच आताच्या अभ्यासक्रमाषी संमंध नसलेल्या प्राध्यापकांनाही त्वरेने बोलावलेले आहे. यामुळे आता अषा अत्यंत नवीन व अभ्यासक्रमाषी संबंध नसलेल्या प्राध्यापकांकडून मुल्यांकनाची वा पेपर काढायची कामे करवून घेतली तर षैक्षनीक स्तरावर त्याचा गंभीर परिणाम होण्याचा धोकाही निर्माण झाल्याने विद्यापीठांच्या  गुणवत्तेवरही प्रष्नचिन्ह उभे असणार आहेत. 
 याबाबत चंद्रपूर जिल्हयातिल प्राध्यापकांची आजच जनता महाविद्यालयात सभा पार पडली सभेला चंद्रपूर षहरातिल व जिल्हयातिल इतर महाविद्यालयातिल नुटा, यंग टिचर्स असोसीएषन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रोफसर्स फोरम तसेच इतर संघटनांच्या सदस्य प्राध्यापकांची मोठया संख्येत उपस्थिती होती, या सभेत बहीश्काराचे हे आंदोलन आनखी तिव्र करण्याचा निर्नय झाल्याचे समजते. एकूणच या आंदोलनाकडे राज्यातिल सर्व विद्याथ्र्यांचे लक्ष लागलेले आहे पण विद्यार्थी संघटना परिक्षा जवळ आलेल्या असतांनाही भुमिका तयार करित नाहीत हेच स्पस्ट होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.