चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिका-याची सेवा शासनाने मागे घ्यावी, यासाठी आयुक्तांच्या दालनात ठिय्या दिल्यानंतर अप्पर आयुक्तांनी भारमुक्त होण्याचे आदेश दिलेत.
श्री. शिंदे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. पदाधिका-यांना विश्वासात न घेता कामे करणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावत हा अविश्वास पारित करण्यात आला होता. प्रस्ताव पारित झाल्यानंतर श्री. शिंदे यांच्या ठिकाणी नवा अधिकारी लागलीच नियुक्त होईल, असा सदस्यांचा अंदाज होता. मात्र, हे गणित चुकले. दोन महिन्यांनंतरही श्री. शिंदे येथे कार्यरत होते. श्री. शिंदे यांच्या ठिकाणी नव्या अधिका-यांची नियुक्ती करावी, यासाठी पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री तसेच आयुक्तांकडे यापूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. असे असतानाही सूत्रे न हलल्याने शिंदे विरोधक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद अहीरकर यांच्या नेतृत्वात आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या देण्याचा कार्यक्रम मंगळवारी ठरला. सुमारे ३० ते ३५ सदस्यांनी नियोजित आंदोलनात भागही घेतला. आयुक्त रेड्डी यांनीही मुख्य सचिवांना लेखी स्वरूपात कळविले असल्याचे शिष्टमंडळाला पत्र दिले. ठिय्या दिल्यानंतर अप्पर आयुक्तांनी सीईओ qशदेंना तातडीने भारमुक्त होण्याचे आदेश दिलेत.