Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी ०९, २०१३

क्रूरकर्मा अफझल गुरूला फाशी

नवी दिल्ली - २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरु याला आज (शनिवार) सकाळी आठ वाजता तिहार कारागृहात फाशी देण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिली. दरम्यान, अफजलला फाशी देण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अफजल गुरु यांच्या पत्नीने राष्ट्रपतींकडे दाखल केलेला दयाअर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून ३ फेब्रवारीला अफजलचा दया अर्ज फेटाळल्याची कागदपत्रे केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपविण्यात आली होती. अखेर आज त्याला फाशी देण्यात आली आहे. अफजल गुरु हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी होता. तो मुळचा काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी होता.
मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याला अशाच प्रकारे पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. या प्रमाणेच अफजल गुरुलाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुपचूप फाशी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाच पाकिस्तानी अतिरेक्‍यांनी 13 डिसेंबर 2001ला संसदेवर हल्ला केला होता. त्यात नऊ सुरक्षा जवान मृत्युमुखी पडले होते, तर सोळा जण जखमी झाले होते. महंमद, हैदर, हमझा, राणा आणि राजा या पाचही अतिरेक्‍यांना सुरक्षा जवानांनी ठार मारले होते. या प्रकरणी अफजल गुरु दोषी आढळल्यानंतर २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविली होती. त्यानंतर त्याच्या पत्नीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यावेळी अफजल गुरू याला देशभरातून त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर अकरा वर्षांनतर त्याला फासावर लटकविण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.