मूल नगर परिशद अंतर्गत विविध प्रभागात सिमेंट क्राॅंक्रिट रस्त्याचे कामे अतिषय नित्कृश्ट दर्जाची आणि आराखडयाप्रमाणे केली जात नसल्यांचा आरोप श्रमिक एल्गारनी केला आहे. या कामाची तक्रारही जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
मूलच्या सर्व प्रभागात मोठया प्रमाणावर सिमेंट क्राॅंक्रिट रस्त्याचे कामे सुरू आहे. हे कामे मंजूर होवून अनेक महिणे होवून गेले, मात्र कंत्राट देण्याच्या वादामुळे प्रत्यक्ष कामे सुरू होण्यास उषीर झाला. मार्च महिणा जवळ येत असल्यांने, कामाची आता लगीनघाई करीत, थातुर-मातुर कामे करीत बिल काढण्याची कसरत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून कामाच्या दर्जाकडे आणि इस्टिमेट आराखडयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब नगर परिशदेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना ठावूक असतांनाही त्यांचे जाणीवपूर्वक मौन बाळगले आहे.
80 एम.एम. साईजच्या दगडाचे खालचे स्तर टाकण्याचे आराखडयात असले तरी, कंत्राटदार ते अर्धा फुट दगडाचे स्तर टाकीत आहे. दगडावर रेती टाकून पाणीने दगडाचे गॅप भरण्याची तरतूद आहे, मात्र त्यावर पाणी टाकले जात नसल्यांने, दगडातील गॅप कायम राहून रस्ता लवकरच खराब होण्याची भिती आहे. क्यूरिंगसाठी पाणीही अत्यल्प वापरले जात आहे.
दगडाचे स्तर टाकल्यानंतर, दबाईसाठी रोडरोलर फिरविले जात नाही, दबाई होत नसल्यांने रस्त्याचे आयुश्य कमी होणार आहे.
मूल षहराच्या विकासासाठी नगर परिशदेकडून कोटयावधीचा खर्च केला जात आहे, मात्र कंत्राटदार या कामाचे दर्जाकडे लक्ष देत नसल्यांने, हा विकास निधी वायाच जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.