सात जणांवर गुन्हे दाखल
राज्य शासन मानवाऐवजी वाघांच्या रक्षणाला प्राधान्य देत आहे. शासनाने ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमाक्षेत्रात वाढ करून ग्रामस्थांना विस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारला स्थानिक वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात इकडे सहभागी असताना संतोष रावत याच्या मालकीची जे सी पी पोलिसांनी जप्त केली
गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या खनिज संपत्तीची चोरी करण्यात येत आहे. यामुळे शासनाला कोट्यवधींचा चुना लागत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नंदवर्धन घाटावरून अवैधरीत्या खनिज संपत्ती चोरून नेत असताना गोंडqपपरी पोलिसांनी सहा लोकांना रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषqसह रावत यांच्यासह अन्य सात लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर रावत यांचा सहकारी जगन धुडसे ङ्करार झाल्याचे वृत्त आहे.
खनिज संपत्तीचे वैभव लाभलेल्या गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. अशाच पद्धतीने नंदवर्धन घाटावरून काल(ता.१४) मध्यरात्री दीडच्या सुमारास दोन टिप्पर व एका जेसीबीच्या सहायाने मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्तीची उचल केली जात होती. गोंडqपपरीचे सहायक पोलिस निरीक्षक बासनवार यांना ही माहिती मिळाली. त्यांनी लागलीच आपल्या चमूसह नंदवर्धन येथील मुरूमघाट गाठला असता, हा प्रकार सुरू असल्याचे त्यांना प्रत्यक्ष दिसून आले. यानंतर त्यांनी मोरेश्वर कोहपरे, अतुल खारकर, सुधीर मडावी, माधव सिडाम, प्रवीण मडावी, अतुल देशमुख या सहाही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडील दोन टिप्पर व एक जेसीबी, असा एकूण वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींची कसून चौकशी केली असता दोन टिप्पर व जेसीबी ही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषqसह रावत यांच्या मालकीची असल्याची माहिती आरोपींनी दिली. यानंतर पोलिसांनी रावत व त्यांचा गोंडqपपरी तालुक्यातील दिवाण जगन धुडसे या दोघांवरही गुन्हे दाखल केले. मात्र, हे दोघेही ङ्करार झाले. या आठही आरोपींविरुद्ध पोलिसांनी कलम ३७९, ३४ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. शुक्रवारी या प्रकरणात सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बासनवार व त्यांचे सहकारी करीत आहेत. खनिज उत्खनन प्रकरणात संतोष रावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. दरम्यान, धरणे आंदोलनात इकडे सहभागी असताना हि कारवाई झाल्याने अवैधररीत्या खनिज उत्खनन करणा-याचे धाबे दणाणले आहे