Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१३

बल्लारपुरात महिला डॉक्टरची आत्महत्या

बल्लारपूर : बामणी येथील डॉ. अनुराधा रवींद्र साळवे यांनी मंगळवारी (ता. १९) गळङ्कास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
महिला डॉक्टरचे पती गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. काही दिवसांपूर्वीच कार अपघातातून हे कुटुंब बचावले होते. बामणी गावातील सुसंस्कृत, सुस्वभावी कुटुंब म्हणून सर्वांना ते परिचित होते. असे असतानाही डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत डॉ. अनुराधाला साडेतीन वर्षांचा आदित्य नावाचा मुलगा आहे. सकाळी मुलाची शाळेची तयारी त्यांनी करून दिली. सासरे विनायकराव यांनी आदित्यला शाळेत सोडून दिले. पती रवींद्र आणि  त्यांची आई विश्रांती घेत होते. सासरे विनायकराव आदित्यला शाळेत सोडून आल्यानंतर घरगुती रुग्णालयाचा दरवाजा बराच वेळ उघडल्या गेला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांनी बोलवून दरवाजा तोडला, तेव्हा अनुराधाचा देह पंख्याला लटकलेला दिसला. आत्महत्येचे कारण अद्यापही कळले नसून, पोलिस तापस करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.