प्रहारच्या पत्रपरिषदेनंतर पोलिस अधीक्षकांनी घेतली दखल
आरोपीविरुद्ध खटला चालविताना पोलिसांनी साक्षीदारांच्या बाजू ऐकून घेतलेल्या नाहीत. शिवाय आरोपीस मदत करण्यासाठीच तीन महिन्यांचा कालावधी लोटू दिला, असा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देश मुख यांनी नागपूर येथील विशेष पोलिस महासंचालक राजेंदर qसग यांना प्रत्यक्ष भेटून दिली. यावेळी हा प्रकार ऐकून महासंचालकही चकित झाले. विनयभंग qकवा बलात्काराच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी कठोर कायदे होत असताना पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात दाखविलेली दिरंगाई म्हणजे असा माजिक कृत्यांना खतपाणी घालण्याचा प्रकार झालेला आहे. दुर्गापूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी जाणीवपूर्वक दोषारोपपत्र दाखल न करून आरोपीस मदत केल्याचा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देश मुख यांनी केला आहे.
चंद्रपूर : साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही दुर्गापूर पोलिसांनी कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल न केल्याने आरोपी जा मिनावर सुटला. आरोपीला मदत करण्यासाठी तपास अधिकाèयांनी दोषारोपपत्र दाखल केले नाही, असा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून होत आहे. दुर्गापूर पोलिसांचा हा प्रकार पोलिस महासंचालकांस मोर गेल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. दरम्यान, याप्रकरणी प्रहार संघटनेने पत्रपरिषद घेऊन माहिती दिल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी दखल घेऊन आरोपपत्र दाखल न केल्याप्रकरणी तपास अधिकारी सोलापूरे यांना निलंबित केले.
दुर्गापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाèया किटाळी येथे २१ सप्टेंबर २०१२ रोजी साडेचार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घराशेजारील सुखदेव तातोबा साव (वय ५२) याने अत्याचार केला. जिल्हा सा मान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालावरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. जी. सोलापुरे आणि दुर्गापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी डी. डब्ल्यू. भगत हे करीत होते. आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोलिसांना ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे अपेक्षित होते. मात्र, या कालावधीत पोलिसांनी हयगय केली. त्या मुळे आरोपीच्या वकिलाने जा मीन अर्ज न्यायालयात सादर केला. त्यावर न्यायाधीश ग. भो. यादव यांनी सुनावणी दिली. त्यात पोलिसांनी ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र सादर न केल्याने आरोपीला जा मीन देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.