Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २३, २०१२

आदिवासींच्या गप्पात रमला अभिनेता सयाजी


देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. १८ : मराठी-हिदीसह दाक्षिणात्य चित्रपटात अभिनय करणा-या सयाजी qशदे या अभिनेत्याने ताडोबाची भ्रमंती करून कोलारा येथील आदिवासी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. qहदी-मराठी चित्रपटसृष्टीतील झगमगाटात वावरूनही मराठी आणि आदिवासी कुटुंबासोबत चर्चा करून जमिनीवर पाय असलेला कलावंत असल्याचे त्याने दाखवून दिले.
सयाजी qशदे हा मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि qहदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता, चित्रपटनिर्माता आहे. बॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटसृष्टीत याचे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. मूळचा सातारा जिल्ह्यातील वेळे (कामथी) येथील असलेला सयाजी qशदे दिवाळीच्या सुट्या सुरू असल्याने शनिवारी (ता. १८) कुटुंबासह ताडोबा येथे आला होता. हमखास वाघाचे दर्शन मिळते, यासाठीच ताडोबा निवडले. पणत्याला वाघाचे दर्शन झाले. मात्र, ताडोबाची निसर्गसंपत्ती आणि अन्य वन्यप्राण्यांना बघून आपण खूष झाल्याचे त्याने सांगितले. नागपूरहून चिमूरमार्गे तो कोलारा गेटमधून ताडोबात गेला. तिथे जिप्सी मालक राजू ताजणे, प्रवीण जांभूळे, पर्यटक मार्गदर्शक बंटी डाहूले आणि कोलारा गेटवरील गाईड कर्मचारी, वनरक्षक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते ताडोबाच्या दर्शनाला गेले. सङ्कारी करून झाल्यानंतर त्यांनी कोलारा गावात जाऊन आदिवासी नागरिकांची भेट घेतली.
सयाजीने मुंबईत मराठी चित्रपट-नाटके व qहदी चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर बॉलिवूड व हॉलीवुडाची वाट धरली. याने आतापर्यंत सुमारे ३० तेलुगू, १२ तमिळ, ४० qहदी, ४ मराठी तसेच २ इंग्लिश, १ कन्नड व १ मल्याळम चित्रपटांमधून कामे केली आहेत. qशदे यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका व त्यांची स्वत:ची व्यक्तिरेखा याबाबत विचारले असता त्यांनी कुठल्याही कलावंतांस त्याच्या योग्यतेनुसार पात्र करण्याची क्षमता असते. कलावंत हा चांगल्या दर्जाचाच असतो. त्याच्या व्यक्तीरेखेवर पात्राचा प्रभाव पडत नाही. ङ्कत्या रात्रीचा पाऊसङ्क या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका qशदे यांना खूप पसंत असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात बातमी व तेंडुलकर आउट हे वेगळ्या मांडणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणार असल्याचे सांगितले. या दरम्यान चिमूर येथे ठाणेदार पंजाबराव मडावी, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन बुटले, सचिन पचारे, सुधीर जुमडे, राष्ट्रवादीचे रमेश कराळे यांनी त्यांचे स्वागत करून ताडोबाच्या दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.