कथानकाला न्याय देणारी मंडळी "स्टार'
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 16, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: chandrapur, vidarbha
चंद्रपूर - चित्रपट दोनच प्रकारचे असतात, एक अभ्यासू आणि बिगरअभ्यासू. क्लास आणि मास या दोघांनाही "हरिश्चंद्राची फॅक्टरी' तेवढाच आवडला. कारण, कार्य-कारण भावाने येणारी रंगसंगती यात जुळून आलेली होती. "स्टार'वगैरे ही संकल्पना मान्य नाही. कथानकाला न्याय देणारी मंडळी ही खरी "स्टार' असतात. यात पडद्यावरचे आणि पडद्यामागचे दोघेही आलेत, अशी प्रांजळ कबुली सिनेअभिनेता नंदू माधव यांनी दिली.
युनिसेफच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सिनेअभिनेते नंदू माधव आणि मिलिंद गवळी आज (ता. 15) चंद्रपुरात आले होते. त्यांनी "सकाळ' विभागीय कार्यालयाला भेट देऊन "सकाळ संवाद' या कार्यक्रमातून विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
ऑस्करचे भूत भारतीयांच्या मानगुटीवरून एकदाचे उतरले पाहिजे. आपण उगाच या पुरस्काराचा बाऊ करतो. प्रत्येक स्पर्धा वेगळ्या नजरेतून बघितली पाहिजे. "विहीर' चित्रपटाची बर्लिन महोत्सवातील रेड कार्पेटची बातमी गाजली नाही. मराठी चित्रपटांची आता वेगवेगळ्या पातळीवर दखल घेतली जात आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.