चंद्रपूर-मार्च महिन्याला सुरवात होत नाही तोच उष्णतेचे चटके बसू लागले असून, तापमापीच्या पाऱ्याने 40 अंशांची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दुपारी साडेबारा ते चारपर्यंत शहरी रस्त्यावरील वाहतूक कमी होऊ लागली आहे.
कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज केंद्र, सिमेंट उद्योग यामुळे चंद्रपूरचे तापमान नेहमीच जास्त असते. नेहमी वर्दळीमुळे ऐन दुपारी वाहतूक व्यवस्था विस्कळित करणाऱ्या चंद्रपूरच्या रस्त्यावर एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी अघोषित संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण होत असते. देशातील अतिउष्ण शहरांमध्ये समावेश असलेल्या चंद्रपूरने मागील वर्षी 47 अंशापर्यंत पातळी गाठली होती. यंदा गत आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे. मागील दोन दिवसांपासून रस्त्यावरील गर्दी कमी होऊ लागली आहे. मागील वर्षी ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद 10 मे रोजी 46.3 अंश सेल्सिअस झाली होती, तर चंद्रपूर शहरात 30 एप्रिल रोजी 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. 2009चा पावसाळा धोकादायक गेल्यानंतर हिवाळ्यात पाहिजे तशी थंडी पडली नाही.
त्यामुळे उन्हाळा चांगलाच तापण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आठवडाभरापासून शहराचे तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस अंशापर्यंत असते. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाही दुकानांत गर्दी दिसत नाही. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. दररोजचे भारनियमन, पाणीटंचाई आणि त्यात ऊन यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील विहिरी आटल्या असून, नळाला पाणी येणेही बंद झाले आहे. लस्सी, कोल्ड्रिंक्स, लिंबूसरबत, उसाचा रस, आंब्याचे पन्हे, ताक आदी शीतपेयांची विक्री होऊ लागली आहे. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने फ्रीज, कूलर, पंखे आणि थंड पाण्याच्या माठांची विक्री होत असते. या साहित्यांच्या खरेदीसाठीही शहरी नागरिक धाव घेत आहेत