Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

हळदी-कुंकू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हळदी-कुंकू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जानेवारी १७, २०१८

महिलांनी घेतली स्वच्छतेची शपथ

महिलांनी घेतली स्वच्छतेची शपथ

मकरसंक्रांतीनिमित्य हळदी-कुंकू व विविध स्पर्धा
बिबी ग्रामपंचायतचे आयोजन

गडचांदूर/ प्रतिनिधी:- 
नजीकच्या बिबी ग्रामपंचायतच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्य हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन पार पडले असून महिलांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
                        कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. स्मिता चिताडे यांच्या हस्ते पार पडले असून अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या सविता काळे उपस्थित होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे समन्वयक सोपान नागरगोजे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेकच्या सोनाली गवारगुर, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रा.पं. सदस्या संगीता ठाकरे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी महिलांना स्वच्छतेवर व शौचालय वापरावर मार्गदर्शन करून स्वच्छतेची शपथ दिली.
                  उपस्थित महिलांसाठी उखाणे स्पर्धा, स्ट्राँ-बॉल, बकेट-बॉल व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. अतिथींच्या हस्ते महिलांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भारती पिंपळकर हिने केले. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केले तर आभार स्वाती देरकर हिने मानले. यशस्वितेसाठी सुलोचना टोंगे, अनिता ढवस, कविता कुमरे, निर्मला गिरडकर, अल्का पिंगे, प्रतिभा पावडे, पूजा खोके, विजया मिलमिले, शीतल पावडे, कोमल अतकारे, गुड्डी अतकारे व गावातील महिलांनी सहकार्य केले.