Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सौरऊर्जा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सौरऊर्जा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जून २०, २०१८

नागपुरात गोरेवाडा तलावावर देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प

नागपुरात गोरेवाडा तलावावर देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प

The first 'Wirling Solar' project in the country on the Gorevada lake in Nagpur | नागपुरात गोरेवाडा तलावावर देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्पनागपूर/प्रतिनिधी:
 पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे. जागेच्या अभावामुळे हा सोलर प्रकल्प तलावातच उभारण्याचा विचार असून देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प म्हणून तो ओळखला जाईल.
पॉवरग्रीडच्या संचालक आणि अधिकाऱ्यांची मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयात बैठक झाली. तीत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, उपअभियंता दीपक चिटणीस, पॉवरग्रीडचे कार्यकारी संचालक संजय गर्ग, व्यवस्थापक अनुराग श्रीवास्तव, उपव्यवस्थापक डॉ. विनय सेनरे उपस्थित होते. गोरेवाडा तलावावर तीन मेगावॅट ‘फ्लोटिंग सोलर’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पॉवरग्रीडने नागपूर महापालिकेसमोर ठेवला आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत, मनपा किती रक्कम या प्रकल्पात गुंतवेल, गुंतवणुकीसाठी किती निधी उपलब्ध करण्यात येईल, प्रकल्पाचा खर्च किती वर्षात निघेल आणि किती वर्ष मोफत वीज सोलरच्या माध्यमातून मिळेल, याबाबत संपूर्ण माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून पॉवरग्रीडच्या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतच्या सर्व शक्यता तपासून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांना दिले.

मंगळवार, जून १९, २०१८

चंद्रपूर येथे सौर उर्जेवर आधारीत कार्यशाळा

चंद्रपूर येथे सौर उर्जेवर आधारीत कार्यशाळा

सौर उर्जा साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारासाठी अपुरस्कृत व अनिवासी सौर उर्जेवर आधारीत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 28 व 29 जून 2018 रोजी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे. सदर कार्यशाळा दोन दिवसाची असून सौर उर्जेवर आधारीत स्वत:चा व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्या कार्यशाळेमध्ये सौर उर्जेवर आधारीत विविध विषयांची माहिती देण्यात येणार आहे. 
या कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी किमान 8 वी पास व 18 वर्षेवरील वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार असावा. त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला मार्क शीट, राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे.
त्यामुळे जे उमेदवार या कार्यशाळेस उपस्थित राहण्यास इच्छुक आहेत त्यांनी 27 जून 2018 पर्यत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, बस स्टॉप समोर चंद्रपूर येथे संपर्क साधवा, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.