Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वाहतूक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाहतूक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, फेब्रुवारी ०९, २०१८

 वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा ;हरविलेला महागडा मोबाईल केला परत

वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा ;हरविलेला महागडा मोबाईल केला परत

 चंद्रपूर(ललित लांजेवार):
वाहतूक पोलीस हा कायमचा साऱ्यांच्या टिकेचा धनी. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणावर कारवाई न करता सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या कार्यातून दिसुन येतो.असाच एक प्रमानिकतेचा परिचय चंद्रपूर येथे वाहतूक पोलिसाने समाजापुढे आणला आहे. 

मंगळवारी चंद्रपूर येथील जटपुरा गेट येथे अमरदीप दिलीप निमसकार वय १८ वर्षे या महाविध्यालयीन विद्यार्थ्याचा ७ हजार किमतीचा मोबाईल जटपुरा गेट परिसरात हरविला. हा हरवलेला मोबाईलचा शोध हा विध्यार्थी घेत होता. तितक्यातच त्या ठिकाणी चंद्रपूर वाहतूक पोलिसातील सहाय्यक वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तुमसरे यांना हा  मोबाईल मिळाला.तुमसरे हे  जटपुरा गेट  कर्तव्य बजावत होते, त्यांना हा हरविला मोबाईल मिळाला.त्यांनी हा मोबाईल आपल्या जवळ ठेऊन घेतला.अमरदीप दिलीप निमसकार हा आपला हरविलेला मोबाईल  विरुद्ध दिशेने शोधत येत होता.तितक्यात सहाय्यक वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तुमसरे यांचे त्या मुलावर लक्ष पडले. त्यांनी त्याला विचारले असता तो आपला हरविलेला मोबाईल शोधात असल्याचे सांगितले.मुलगा हा गरीब घरचा असल्याने पैश्याची जमवाजमव करून घेतलेला मोबाईल अचानक हरविल्याने तो घाबरून गेला होता.  नरेंद्र तुमसरे यांनी त्याला पाणी पाजून शांत करत आपल्या खिश्यात असेलेला मोबाईल काढून दाखवला. मोबाईल बघताच  घाबरलेला मुलगा शांत झाला. त्यानंतर त्याची संपूर्ण चौकशी करून वाहतूक पोलीस नरेंद्र तुमसरे यांनी त्या मुलाला मोबाईल परत केला.मुलगा हा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील असून तो चंद्रपूर येथे एका वसतिगृहात राहतो व तो कामानिमित्य बाजारात गेला होता,मात्र रस्त्यातच त्याचा मोबाईल हरविला व तो  मोबाईल चंद्रपूर वाहतूक शाखेतील सहाय्यक वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तुमसरे यांनी  आपल्या प्रामाणिकता दाखवीत किमती मोबाईल परत केला. यावरून पुन्हा एकदा वाहतूक पोलिसाच्या नदारीचा परिचय सर्वांपुढे आला.त्यामुळे नरेंद्र तुमसरे यांच्या प्रमानिकतेच्या परिचयामुळे   पुन्हा एकदा वाहतूक विभागाची मान  उंचावली आहे.



गुरुवार, फेब्रुवारी ०८, २०१८

चंद्रपूर मनपाने घेतली काव्यशिल्पच्या बातमीची दखल;उखडलेला सिग्नल दुसऱ्याच दिवशी लागला

चंद्रपूर मनपाने घेतली काव्यशिल्पच्या बातमीची दखल;उखडलेला सिग्नल दुसऱ्याच दिवशी लागला

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

मंगळवारी काव्यशिल्प डिजिटल मीडियाने वाहतूक सिग्नल निद्रावस्थेत ;पालिकेचे दुर्लक्ष या माथड्याखाली बातमी प्रकशित केली होती,त्या बातमीची दखल घेत चंद्रपूर वाहतूक विभाग व चंद्रपूर शहर महानगर पालिकेने दखल घेतली आहे, व दुसऱ्याच दिवशी १५ दिवसांपासून बंद असलेला सिग्नल सुरु करून नागरिकांच्या सेवेत दाखल केला आहे.  गेल्या दीड- दोन वर्षा आधी गंजलेले वाहतूक सिग्नल काढून नवीन सिग्नल बसविण्यात आले होते .हा  नवीन सिग्नल बसविण्याचा कार्यक्रम टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात आला होता . मात्र शहरातील बंगाली कॅम्प परिसरात नवीनच लागलेला  उभा असलेला सिग्नल गेल्या १५ दिवसांपासून गाड झोपलेल्या अवस्थेत दिसून येत होते,  त्यामुळे शहरातील अत्यंत दळवळीच्या ठीकानीची सुरक्षा हि वाऱ्या असलेल्याचे चित्र समोर येताच काव्याशिल्पने बातमी प्रकाशित केली होती,याच बातमीची दखल शहर प्रशासनाने घेतली.
बंगाली कॅम्प परिसर हा चंद्रपूर शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो,  या सिग्नलवर  दिवसातून जळपास १२ तास मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची आवश्यकता असते, हाच मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातून चौफेर जातो.त्यामुळे या चौकाची सुक्षेवर अत्यंत कटाक्षाने लक्ष असणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात घडून येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. मात्र गेल्या १५ दिवसांपासून या चौकातील सिग्नल हा पडलेल्या अवस्थेत असल्याने याकडे वाहतूक पोलीस व महानगर पालिकेच्या देखरेख विभागाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.हा चौक अत्यंत वर्दळीचा असल्याने नेहमी या ठिकाणी जीवघेणे अपघात घडत असतात त्यामुळे इतके दिवस उलटून सुद्धा याकडे वाहतूक पोलीस व महानगर पालिकेच्या मेंटनन्स विभागाचे लक्ष गेले नव्हते . 
मनपाने व वाहतूक विभागाने काव्यशिल्पच्या माध्यमातून तत्काळ दखल घेतल्याने सिग्नल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.त्यामुळे  बंगाली कॅम्पच्या नागरिकांनी काव्यशिल्पचे धन्यवाद व्यक्त केले आहे.
अगोदर पडलेल्या अवस्थेत असलेला खांब  

बुधवार, जानेवारी १७, २०१८

वाहतूकी बद्दल विद्यार्थ्यांना जनजागृतीचे धडे

वाहतूकी बद्दल विद्यार्थ्यांना जनजागृतीचे धडे

 चंद्रपूर पोलिसांचा उपक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी: 
           चंद्रपूर वाहतूक शाखेतर्फे विध्यार्थ्यांना लहान वयापासूनच वाहतूक-रहदारी बद्दल माहिती मिळावी त्यांना वाहतुकीचे नियम समजावे. व इतर बाबींचे ध्यान मिळावे या अनुशंघाने चंद्रपूर वाहतूक विभागाने शहरातील  विविध शाळेत शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना वाहतुक व्यवस्थे बद्दल जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

                या वाहतूक जनजागृती मोहिमेअंतर्गत वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीसांनी हा चिमुकल्या विध्यार्थ्यांच्या  हातात विविध मजकूर लिहिलेले बोर्ड दिले यात   हेल्मेट घाला, सीटबेल्ट लावा, सिग्नल तोडू नका, नो-पार्कींगमध्ये गाडी उभी करू नका, वाहतुकीचे नियम तोडू नका अश्या प्रकारचा मजकूर लिहून होता,या चिमुकल्यांच्या हातातला मजकूर बघून रस्त्याने जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वार अवाकपणे बघू लागले. 
                      विध्यार्थी हा शाळेत जायला लागल्या पासूनच त्याला घराबाहेर पडावे लागते, अश्यावेळी त्याला वाहतुकीचे संपूर्ण ध्यान असणे आवश्यक असल्याने वयाच्या लहानपणापासूनच म्हणजे शालेय वयापासूनच वाहतुकीचे ध्यान  असणे आवश्यक समजत चंद्रपूर पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदशनात वाहतूक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी या उपक्रमाची सुरवात केली आहे, यावेळी वाहतूक कार्यालय चंद्रपूर येथून विद्यानिकेतन शाळेच्या  विद्याथ्यांची जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. हि रॅली प्रियदर्शनी ईंदिरा गांधी चौकात आल्यानंतर विध्यार्थ्यांना   सिग्नल बद्दल माहिती, लाल, पिवळा,हिरवा लाईट सिंगलवर केव्हा लागतो, वाहतूक पोलिसांशी हुज्जतबाजी करू नये, दारू पिऊन वाहन चालू नये,वेगवान गाडी चालविणे हा एक नशा  आहे,  सोबत पादचाऱ्यांनी कुठून चालावे. वाहतूकदार दंडित केव्हा होतो, वाहन कोणत्या साईडने चालवावे यासह अनेक गोष्टीबद्दलचे मार्गदर्शन वाहतूक पोलिसांतर्फे  विध्यार्थ्यांना करण्यात आले. विज्ञार्थ्यांनी देखील मनलाऊन संपूर्ण नियम ऐकून घेतलॆ. या जनजागृतीपर रॅलीमध्ये अनेक विध्यार्थी ,शिक्षक शिक्षिका व पोलीस अधिकारी व वाहतूक कर्मचारी उपस्थित होते.