Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
वन्यजीव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
वन्यजीव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, ऑक्टोबर २३, २०१८
रविवार, डिसेंबर १०, २०१७
वाघाने घेतला निर्मलाचा बळी
सिन्देवाही -येथील निर्मला मुखरुजी निकोडे (वय ५२ ) ही महीला शेतावर एकटीच गेली. सांयकाळ झाली परंतु घरी वापस आली नाही. तिचा सांयकाळी शोध घेतला असता मिळाली नाही. मग सकाळी पुन्हा शोध घेतला असता नाल्यामध्ये छिन्नविचीन्न अवस्थेत वाघाने खाल्लेले आढळले.
गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७
वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात चार जण वनविभागाच्या ताब्यात
भद्रावती/वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सलोरी येथील कक्ष ९२९ परिसरातून काही इसमानी जंगलात पहाटे दोन च्या सुमराज जाळे लावले होते जाळयात वन्यप्राणी अडकविण्याच्या प्रयत्नात असतांना यावेळी वनविभागाचे कर्मचारी गस्त घालीत असतांना हा प्रकार लक्षात आल्याने वन्यप्राण्यांची शिकार झाली नाही पाहिजे या आशेने त्या कक्ष परिसरात कसून शोध घेतला तर जंगलात जाळे लावून चार व्यक्ती बसून असलेले आढळले. यामध्ये विनोद मगरे(२६), निकेश पाटील(२७), शैलेश पाटील(३०), शंकर रंडई(५०) रा. सलोरी असे आरोपींची नावे असून यांच्या कडून भाले, जाळे ताब्यात घेतले . त्यांच्यावर कलम १९७२ भारतीय वन्यजीव अधिनियम ०२ सप्टेंबर १९५१ नुसार कारवाही करून ताब्यात घेतले. ही कारवाही वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. आक्केवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एम. एम. लांडे, वनकर्मचारी एन. एल. सिडाम यांनी केली
शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७
37 हजार हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
नागपू/ प्रतिनिधी - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील 37 हजार हेक्टरहुन अधिक झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
नागपूर विभागातील झुडपी जंगल क्षेत्राबाबत केंद्र शासनाने गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालात 1,78,525 हेक्टर झुडपी जंगल क्षेत्रापैकी वनव्यवस्थापनास योग्य असलेले 92,116 हेक्टर क्षेत्र भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव / संरक्षित वन म्हणून घोषित करण्याची शिफारस केली होती. भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत.
त्यानुसार राज्य शासनाने आतापर्यंत 37,490.112 हेक्टर क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. उर्वरित झुडपी क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून आणखी 50,000 हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र डिसेंबर अखेरपर्यंत राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात येईल. सदर क्षेत्रास आता भारतीय वन अधिनियम, 1927 च्या तरतूदी लागू होणार असल्याने ते अधिक संरक्षित होईल तसेच त्यामुळे महाराष्ट्राच्या राखीव वनक्षेत्रात देखील वाढ होणार आहे.
सदर क्षेत्रावर पुढील पावसाळ्यात वनीकरणाची कामे घेण्यात येतील, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. नागपूर विभागातील अधिसूचित क्षेत्रामध्ये नागपूर जिल्हयातील 1419.12 हे., वर्धा जिल्हयातील 5266.75 हे., गोंदिया आणि भंडारा जिल्हयातील 25863.312 हे., गडचिरोली जिल्हयातील 3093.58 हे., चंद्रपूर जिल्हयातील 1847.32 हे. याप्रमाणे 37490.112 हे. इतके झुडपी क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमध्ये आणखी एका वाघाचा मृत्यू
चंद्रपूर / प्रतिनिधी:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मुल वन परिक्षेत्रात जनाळा नियतक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळला.
जनाळा येथील रहिवासी आत्माराम बापू पोरटे यांची गाय दिनांक १४/११/२०१७ रोजी वाघाने ठार मारल्याचा अर्ज क्षेत्र सहाय्यक जानाळा यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज क्षेत्र सहायक आणि वन कर्मचारी यांनी घटन्स्थळी भेट दिली. मृत गायीचे पंचनामा केल्यानंतर सदर परिसराची पाहणी केली असता, जवळच मृत वाघाचे शव आढळून आले. सदर घटना मुल वनपरिक्षेत्र अंतर्गत जानाला उपशेत्रातील जनाला नियातक्षेत्रात कक्ष क्रमाक ३५५ मधे घडलेली आहे. मृत झालेला वाघ अवयस्क असून दुसरया वाघाच्या हल्य्यात मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. वाघाचे शरीराचा मागील भाग अन्य प्राण्याकडून खाण्यात आले असून, वाघाचा मागचा पाय व शेपूट शरीरापासून दुसऱ्या वाघाने वेगळा केलेला आढळला.
घटनेची माहिती मिळताच श्री मुकुल त्रिवेदी, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, श्री गजेंद्र नरवणे, उप संचालक, बफर, ताडोबा, श्री पी एस शेळके, सहायक वनसंरक्षक प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव चे प्रतिनिधी बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण चे प्रतिनिधी योगेश दुधपचारे व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री शेषराव बोबडे यांनी घटना स्थळ गाठून पाहणी केली. वाघाचे शव विच्छेदन डॉ संदीप छोन्कर, पशुधन विकास अधिकारी, मुल डॉ रविकांत खोब्रागडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प डॉ निलेश खलाटे, पशुधन विकास अधिकारी यांनी केले.
वाघाचे मागील भाग वन्यप्राणी कडून खाण्यात आले असल्याने लिंग कळू शकले नाही. वाघाचा मृत्यू चे प्राथमिक अंदाज दोन वाघातील आपापसातील झुंज असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. शव विच्छेदन दरम्यान व्हीसेरा पुढील तपासासाठी घेण्यात आलेला आहे.