Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नक्षलवादी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नक्षलवादी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जुलै २७, २०१८

वडीलाने मुलाची काढली जिवंतपणी अंतयात्रा

वडीलाने मुलाची काढली जिवंतपणी अंतयात्रा

गडचिरोली/प्रतिनिधी: 
वडीलानेच आपल्या मुलाची जिवंतपणी च अंतयात्रा काढल्याची घटना शुक्रवारी गडचिरोलीतील रेगडीगुट्टा येथे घडली. आपल्या मुलाने नक्षल चळवळीत सहभागी आहे आणि त्याने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्याच्या या कृत्यामुळे तो नक्षल चळवळीत असेपर्यंत आमच्यासाठी मेला आहे, असे सांगत नक्षल कमांडर महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा या नक्षल कमांडरच्या वडिलांनी शुक्रवारी येथे त्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यात शेकडो लोक सहभागी झाले होते.
२८ पासून सुरू होत असलेल्या नक्षलींच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने २५ ते २७ दरम्यान जनमैत्री मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सहभागी नागरिकांनी नक्षलवाद्यांमुळे नाहक त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे रेगडीगुट्टा येथील रहिवासी असलेले नक्षल कमांडर महेशचे वडील रावजी गोटा यांनी मुलाच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा पुतळा तयार करून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
ही अंत्ययात्रा महसूल मंडळ कार्यालयापासून मुख्य मार्गाने निघून शिवाजी चौकात पोहोचली. तिथे नक्षल कमांडर महेश आणि नक्षल डिव्हीजन कमांडर जोगन्ना उर्फ घिसू उर्फ चिमला उर्फ नरसय्या लिंगय्या रा. करीमनगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी नक्षलवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या. मुलगा महेश याने नक्षल चळवळीतून बाहेर येऊन आत्मसमर्पण करावे आणि सामान्य जीवन जगावे, अशी भावना त्याचे वडील रावजी गोटा यांनी व्यक्त केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप व एटापल्ली ठाण्याच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.




शनिवार, मे १९, २०१८

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा टेरर;लाकूड डेपोला लावली आग

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा टेरर;लाकूड डेपोला लावली आग

भीतीचे वातावरण;23 बिट जळाले:९०हजारांचे नुकसान 
नागपूर/प्रतिनिधी:
मागील महिन्यात झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत ४० नक्षलवादी मारल्या गेल्या नंतर चवताडलेल्या  नक्षलवाद्यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर तलवाडा येथील लाकूड डेपोला आग लावली. याशिवाय आलापल्ली ते भामरागड या मुख्य मार्गावर काही ठिकाणी रस्त्यात झाडे आडवी टाकून वाहतूक मार्ग बंद करत आपली टेरर कायम ठेवला.
आलापल्ली पासून 12 किलोमीटरवर असलेल्या तलवाडा या गावाजवळील आलापल्ली वनपरिक्षेत्राचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी पहाटेच्या सुमारास जाळला. यावेळी तिथे एक बॅनरसुद्धा लावले , त्यात वनविभाग आणि पोलीस विभागाचा निषेध करा, असे आवाहन करण्यात आले आहे. या डेपोत मोठ्या प्रमाणात बिट म्हणजेच जळाऊ लाकूड उपलब्ध आहे. या आगीत अंदाजे 23 बिट जळाले असून जवळपास 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळपासून आलापल्ली वन परिक्षेत्र अधिकारी किरण पाटील हे स्वतः तिथे हजर असून आग नियंत्रनात आली आहे. तसेच तलवाडापासून सुमारे 2 किमी अंतरावर मुख्य मार्गावर एक झाड पाडून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तिथे पण एक लाल कापडी बॅनर लावण्यात आले आहे. एवढेच नाही तर याच मार्गावर भामरागडच्या अलिकडे ताडगावजवळही अशाच प्रकारे झाड पाडून बॅनर लागले आहे. त्यामुळे सकाळपासून वाहतूक बंद आहे. जंगल परिसर असल्याने गेलेल्या गाडया लगेच परत येत आहेत.

     -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

गुरुवार, मे ०३, २०१८

माहिती द्या अन व्हा लखपती...

माहिती द्या अन व्हा लखपती...

गडचिरोली/प्रतिनिधी:
 गडचिरोलीत ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहिम उघडली आहे. निष्पाप आदिवासींची हत्या करणाऱ्या पाच जहाल नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी १ कोटी ७१ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यात एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच वर्तमानपत्रांना जाहिराती देऊन गडचिरोली पोलिसांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे. 
पोलीस अधिकारी आणि सी-६० च्या जवानांनी गडचिरोलीत नुकत्याच केलेल्या कारवाईत ३९ नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांचं मनोबल वाढल्याने पोलिसांनी थेट जाहिराती देऊनच नक्षलवाद्यांच्या टॉप पाच कमांडरला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी या नक्षलवाद्यांच्या फोटोसह सर्व वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत. 'द्या माहिती, व्हा लखपती' अशा मथळ्याखाली या जाहिराती देण्यात आल्या आहेत. 
या जाहिरातीत मल्लोजुल्ला वेणुगोपाल ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू ऊर्फ लच्छन्ना अभय याच्यावर ६० लाख, दीपक ऊर्फ मिलिंद ऊर्फ सह्याद्री तेलतुंबडे याच्यावर ५० लाख, नर्मदाक्का ऊर्फ उषाराणी किरणकुमार हिच्यावर २५ लाख, जोगन्ना ऊर्फ चिमाला नरसय्या याच्यावर २० लाख तर पहाडसिंग ऊर्फ अशोक ऊर्फ बाबुराव तोफा याच्यावर १६ लाखाचं बक्षीस जाहिर करण्यात आलं आहे. हे सर्वजण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगडमधील आहेत. हे पाचही जण जहाल नक्षलवादी आहेत. त्यांनी गडचिरोलीत अनेक आदिवासींची हत्या केली असून त्यांचा घातापाती कारवायांमध्येही सहभाग असल्याचं पोलिसांनी जाहिरातीत म्हटलं आहे. या नक्षलवाद्यांना अटक केल्यास किंवा त्यांना जीवे मारले तरीही बक्षीस दिले जाणार असून संबंधितांचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी या जाहिरातीत स्पष्ट केलं आहे. ०७१३२-२२२३४८, ९४२१६९९८०८, ७२१८८७८१७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गडचिरोली पोलिसांनी केलं आहे.

गुरुवार, फेब्रुवारी २२, २०१८

 नक्षल्यांकडून पोलिस पाटलाची हत्या

नक्षल्यांकडून पोलिस पाटलाची हत्या

गडचिरोली/प्रतिनिधी:
बुधवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील लांजी येथील पोलिस पाटलाची  दगडाने ठेचून व नंतर गळा चिरुन नक्षलवाद्यांनी हत्या केली. कटिया पैका कुमोटी(५४) असे मृत पोलिस पाटलाचे नाव आहे. 
                     कटिया कुमोटी हे बुधवारी पत्नी, मुलगा व सुनेसह आपल्या शेतात गेले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास १५ ते २० हातात  शस्त्र  नक्षलवादी शेतावर गेले. त्यांनी पोलिस पाटील कटिया कुमोटी यास बाहेर नेले. कटियाच्या पत्नीने जाब विचारला असता नक्षल्यांनी काहीही उत्तर दिले नाही. गुरुवारी सकाळी गावा बाहेरच्या जंगलात कटियाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करुन नंतर गळा चिरण्यात आला, अशी प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वी लांजी गावानजीकच्या जंगलात चकमक उडाली होती. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांचा कटिया पैका कुमोटी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशय होता याच संशयावरुन नक्षल्यांनी कटिया कुमोटी याची हत्या केली असावी, असा अंदाज आहे सध्या वर्तविल्या जात आहे.