Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

दगडफेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दगडफेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जानेवारी ३१, २०१८

चारचाकी वाहनांवर दगडफेक:१५ दिवसातील ही दुसरी घटना

चारचाकी वाहनांवर दगडफेक:१५ दिवसातील ही दुसरी घटना


 
१५ दिवसातील दुसरी घटना
Striking incidents on the Dathla road caused panic | दाताळा मार्गावर दगडफेकीच्या घटनांमुळे दहशत
चंद्रपूर प्रतिनिधी:  
येथील दाताळा मार्गावर रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दुचाकी व चारचाकी वाहनांवर दगडफेक होत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. सोमवारी रात्री १०.५० वाजता जीवनज्योती कॉलनी जगन्नाथबाबानगर, दाताळा रोड येथे घरासमोर उभ्या असलेल्या एका कारवर अज्ञात इसमाने दगडफेक करून काचा फोडल्या. गेल्या १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे.

सोमवारच्या रात्री १०.५० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक उमेश सिताराम आडे हे एमएच २९ एआर १९८५ या क्रमांकाची सुझूकी सेंट्रो कार दाताळा मार्गावरील जीवनज्योती कॉलनी जगन्नाथ बाबानगर येथील घरासमोर उभी करून ठेवली होती. दरम्यान, काही अज्ञात इसमांनी कारवर दगडफेक करून रॉड व लाकडाने कारच्या काचा फोडल्या. याबाबत उमेश आडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

या मार्गावर यापूर्वी १६ जानेवारीला सुद्धा अशाच प्रकारे होंडा कारचा पाठलाग करून अज्ञात इसमांनी दगडफेक केली होती. या घटनेतही कारचे मोठे नुकसान झाले होते. १५ दिवसानंतर पुन्हा अशीच घटना घडल्याने या मार्गावर जाणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.काही महिन्यांपूर्वी देखील शहरातील जेलरोड परिसरात अश्याच प्रकारे अध्यात इसमांकडून कारवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अश्याच प्रकारे आणखी घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे   पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेवून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या मार्गावर नेहमीच वर्दळ राहत असल्याने लुटण्यासाठी अशा घटना घडत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.