ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
Thane municipal corporation hospital
छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात घटना : ठाणे शहरात ताप पसरत असताना एका रात्रीत १७ जणांचा मृत्यू
ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ठाणे शहर तापाच्या व्यापक प्रकोपाने ग्रासले असून आरोग्यसेवेचे संकट आणखीनच वाढले आहे.
आधीच आव्हानांना तोंड देत असलेल्या रुग्णालयाने याआधी प्रचलित आरोग्य परिस्थितीमुळे 5 जीव गमावल्याची नोंद केली होती. मृत्यूच्या अचानक वाढीमुळे स्थानिक अधिकारी आणि समुदायामध्ये चिंता वाढली आहे, ज्यामुळे तापाचा प्रसार रोखण्यासाठी मजबूत आरोग्यसेवा उपायांची तातडीची गरज आहे
सध्याच्या आरोग्य संकटामुळे प्रभावित झालेल्यांना वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. या चिंताजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेपाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दु:खद घटना
प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉकटर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांनी आयुष्य गमावले.यातील 13 रुग्ण हे आय सी यू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते.रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे,
मात्र सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे,
10 तारखेला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते, आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे
ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काय चाललंय, असा सवाल उपस्थित झाला आहे. याच कारण म्हणजे या रुग्णालयात एकाच दिवशी 17 रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी पाच गेलेत. यात एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. पाचही रुग्णांचा मृत्यू वेळेत उपचार न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केलाय
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.