WhatsApp share | Share on WhatsApp
भारतीय जनता युवा मोर्चा उद्योजक विकास मंच आणि नागपूर मेट्रो यांच्या अंतर्गत फ्रीडम पार्क येथे काल दिनांक चार मार्चला सोशलस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सपने जुनून और उद्योजकता या थीमवर आधारित "तुम्हारी मेरी बाते', हा कार्यक्रम होता उद्योजक विकास मंच गेल्या सहा महिन्यापासून 35 वर्षा खालील व्यावसायिक तरुणांना एकत्रित आणून एका मंचावर आणण्याच्या प्रयत्नात कार्यरत आहेत.
याच उपक्रमा अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे एक स्नेह मिलन करण्याचा प्रयत्न सोशलस या कार्यक्रमाद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन अथर्व गोगायन यांचे असून त्याच्या स्वरचित कविता आणि त्यासोबतच अक्षय चारभाई ,आकांक्षा चारभाई ,सई चिटणीस ,फाल्गुनी खटी ,अमेय वैद्य ,चिन्मय जोशी इत्यादी गायक कलाकारांनी गाणी सादर केली . तसेच अक्षय हरले, ओम जोधपुरकर अजिंक्य खांबेटे आदित्य पहुजा इ. वादकांनी साथ संगत केली तर गौरव
टांसाळे यांनी कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुलभ देशपांडे यांच्य नेतृत्वत आणि संपूर्ण उद्योजक मंचाची टीम,गौरव टाँकसाले, गोपी मोरघड़े, रवी भांडारकर, तेजस्विनी भंडारकर, प्रशांत रायपुरकर, सौरभ जगशेट्टिवर, यूसुफ़ लोहेवाला, हश्वर्धन फूके, प्रणव घुगरे अशासारख्या अनेक मित्रांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात अथक प्रयत्न केलेत. कार्यरत होती. शिवानी दाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. उद्योजक विकास मंच ही संस्था नेशन फर्स्ट या विचारधारे खाली जे लोक एकत्र येऊन काम करतील त्या तरुणांना एकत्रित आणून भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत ही संस्था काम करते. युवकांचे चांगले संघटन आपण तयार करू हा या मागचा उद्देश आहे .एव्हाना आता 70 ते 80 लाखापर्यंतचे उद्योगाचे आदान प्रदान झाले असून जवळपास 80 लोकांनी (युवकांनी )एकत्रित येऊन केलेले आहे. सोशलस या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून इमोशनस भावना आणि व्यवसायाची वास्तविकता यांना अतिशय सुंदर पद्धतीने जोडण्याचे आणि सादरीकरणाचे काम अथर्व गोगायन यांच्या तुम्हारी मेरी बाते या कार्यक्रमाच्या द्वारे झाले हा कार्यक्रम म्हणजे उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा देणारा कार्यक्रम होता.