मंगळवारी दुपारनंतर अचानक वातावरण बदलले आणि राज्यात होळी (Holi) आणि धुळवडीचा उत्साह असतानाच Unseasonal Rain अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अवकाळी पावसाचा कहर कालपासून सुरु झालाय. #MumbaiRains #MumbaiWeather
राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) हजेरी लावली आहे.
नागपूर हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढचे तीन दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. 6 ते 9 मार्च काळात महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता; Maharashtra Unseasonal Rain 6-7 मार्च, गुजरात व मध्य महाराष्ट्रात, 7 मार्चला मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता आहे.
राज्यात ५ ते ८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची (Rain) शक्यता आहे. यामध्ये ५ मार्चला काही ठिकाणी ढगाळ हवामान (Cloudy weather) राहून पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर ८ मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट
प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, गडचिरोली, जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस म्हणजेच सात ते अकरा मार दरम्यान आकाश अंशिक ढगाळ राहून ८ मार्च रोजी काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे यादरम्यान विजांचा कडकडाट होणे होईल, पावसाचा अंदाज लक्षात घेता रब्बी पिकातील पिकांची काढणी, मळणी करून बियाणे सुरक्षित ठेवावेत, असे आव्हान देखील करण्यात आले आहे.
#MumbaiRains #MumbaiWeather