ताडोबा बफर क्षेत्रातील चंद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गतमामला वनक्षेत्र मधे वाघ मृतअवस्थेत आढळला. उद्याला शवविच्छेदन करण्यात येईल.
ताडोबा अभयारण्याच्या परिसरात असलेल्या मामला जंगलात एका वाघाचा मृतदेह आढळला. गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रभरात आठ वाघांचा मृत्यू झाला असून, त्यातील सहा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आज पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलामध्ये असलेल्या वाघांमध्ये झुंज होऊ लागल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झालेला असतानाच वाघाच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. साधारणतः आठ ते दहा दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात दोन महिन्यांत सात वाघांचा मृत्यू झाला आहे. ताडोबा बफरअंतर्गत वन कर्मचारी गस्तीवर असताना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वाघाचा मृतदेह मिळाला. या घटनेची माहिती ताडोबा बाफरचे उपवन संरक्षक पाठक यांना देण्यात आली. वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला आहे. आज शवविच्छेदन केल्यानंतर नेमके कारण सांगता येईल, असे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले.
जिल्ह्यात २०३ वाघ आहेत. लवकरच जिल्ह्यातील ५ वाघ नवेगाव-नागझिराच्या जंगलात स्थलांतरित केले जाणार आहे. Chandrapur: A tiger was found dead in Tadoba Andhari Tiger Reserve (TATR) in the Chandrapur district of Maharashtra today, a seven death of the tiger in the area in a last 2 month.
A forest guard came across the carcass which was in a decomposed state this afternoon. A team of forest officials including Field Director and other rushed to the spot.