राष्ट्रवादी आणि भाजपची युती होणार?
नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल (Nagaland Assembly Elections Result) नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजप-एनडीपीपी (BJP-NDPP) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये (Nagaland) सरकार स्थापन केले आहे.
(Nagaland) नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी (BJP-NDPP) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये (Nagaland) सरकार स्थापन केलं आहे. निफियू रिओ (Neiphiu Rio) हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. सात जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळं नागालँडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा देखील सुरु आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.