Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ०३, २०२३

Mobile Coverage नसणाऱ्या गावांसाठी महत्वाची बातमी

देशातील 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात

-    मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांची माहिती

मोबाईल कवरेज नसणाऱ्या गावांसाठी महत्वाची बातमी Cellular data networks in India

नागपूर/ Nagpur (3 फेब्रुवारी 2023)

देशातील अशा गावांमध्ये ज्या गावात कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात ‘4 जी  सॅच्युरेशन प्रकल्पा ‘  अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेड –बीएसएनएल, नवी दिल्लीच्या कार्पोरेट कार्यालयाच्या मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जगामध्ये मोबाईल उत्पादक तसेच 3जी, 4 जी आणि 5 जी सेवा देणाऱ्या काही मोजक्याच कंपन्या आहेत. याच क्रमामध्ये भारतात सुद्धा   3जी, 4 जी आणि 5 जी टेलिकॉम सेवा  देणारी मोबाईल  कंपनी असली पाहिजे या उद्देशाने भारत सरकार प्रयत्न करत आहे. बीएसएनएल द्वारे पदार्पण केलेली 4-जी सेवा ही विश्वस्तरावरील राहणार असून या सेवेला   5जी सेवेमध्ये  रुपांतरित होण्याला  वेळ लागणार नाही. सध्याचे  4 जी  उपकरण  5जी मध्ये अपडेट होतील, अशी  माहिती वडनेरकर यांनी  दिली. राज्यामध्ये 4,900 खेड्यांमध्ये बीएसएनएलच्या  4 जी   सेवेची  सुरुवात करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर यासारख्या दुर्गम  भागामध्ये  मोबाईल टॉवर्स  4जी मध्ये अपडेट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. mobile 3G / 4G / 5G coverage


याप्रसंगी  बीएसएनएलचे नागपूर  क्षेत्राचे महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांनी सांगितलं की,  भारतात बनणाऱ्या मोबाईलमुळे  ग्राहकांच्या कॉलची, डेटाची  सिक्युरिटी सुनिश्चित होईल त्याचप्रमाणे यामुळे रोजगार उपलब्धता होऊन तंत्रज्ञानाची निर्यात वाढेल.  महाराष्ट्र सर्कलचे बीएसएनएलच्या एकूण महसूल आणि संकलनामध्ये जवळपास 20% योगदान असल्याची माहिती महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा रोहित शर्मा यांनी दिली. 

Cellular data networks in India.

या पत्रकार परिषदेच्या पूर्वी  बीएसएनएलच्या 19 व्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन  संचालक अरविंद वडनेरकर यांच्या हस्ते आज सकाळी नागपूरच्या  रवी नगर येथे झालं .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.