Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी ०९, २०२३

डॉ. योगेश अडबलवाड यांचे-फेलोशिफ इन स्पाइन सर्जरी या वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन...!!

डॉ. योगेश अडबलवाड यांचे-फेलोशिफ इन स्पाइन सर्जरी या वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन...!!




नांदेड प्रतिनिधी:- बालाजी सिलमवार -

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सरसम येथील रहिवासी असलेले पूर्णा पंचायत समितीचे सेवानिवृत्त सहायक.प्रशासन अधिकारी श्री.माधवराव अडबलवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ.योगेश माधवराव अडबलवाड MBBS. MS orthopedic (सायन हॉस्पिटल मुंबई) यांचे नुकतेच fellowship इन मिनीमल इनव्हॅसिव्ह spine surgery (FIMSS) बॉम्बे हॉस्पिटल कन्सलटंट येथे स्पाईन सर्जन (मणक्याचे विकार तज्ञ) डॉ. अरविंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी ही फेलोशिप अथक परिश्रम घेवून नुकतीच पूर्ण केली आहे.त्याच्या यशात वडील माधवराव अडबलवाड आणि परिवाराचा मोलाचा वाटा आहे.



कुठल्याही पालकाला अभिमान वाटावा असे डॉ.योगेश अडबलवाड चे यश आहे.डॉ योगेश हे पुढील वैद्यकीय सेवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नांदेड येथे करणार असल्याचे म्हटले आहे.तरी त्यांच्या पुढील वैद्यकिय क्षेत्रातील कारकिर्दीसाठी आणि गरजू घटकाची त्याच्या हातून सदैव चांगली सेवा घडण्यासाठी औरंगाबाद येथील श्री राजीव सिलमवार यांच्यासह सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त श्री सोपान मारकवाड आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आशिष मोतेवार,डॉ.संजय मारकवाड,डॉ.प्रवीण पाकलवाड,पोलिस निरीक्षक श्री मंडलवार साहेब,सुरेवाड,तुकाराम अडबलवाड सर, मित्रमंडळी, नातेवाईकांसह, हिमायतनगर तालुक्यासह अनेकांनी डॉ.योगेश चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत....!!

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.