*६ डिसेंबरला धारीवाल उद्योग बंद आंदोलन*
*खासदार बाळू धानोरकर यांचा इशारा*
चंद्रपूर - सोनेगांव येथील तलावामुळे परिसरातील शेतीमध्ये दलदल होत असते. यामुळे जमीन शेतीयोग्य राहीली नाही. धारीवाल कंपनीच्या 10 किलोमीटर परीसरातील शेती व जनजीवनावर होणाऱ्या दुष्परीणामासंदर्भात वारंवार सूचना देऊनही त्याबाबात कंपनी गंभीर नाही. त्यामुळे परीसरातील पिडीत शेतकऱ्यासह येत्या ६ डिसेंबरला धारीवाल उद्योग बंद करण्याचा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे.
धारीवाल उद्योग समुहाच्या अॅश पाँडमधून निघणा-या राखेमुळे नदी व नाल्यामध्ये जाऊन पाणी प्रदुषीत होत आहे. यामुळे जनावरांचे आरोग्यास देखील धोका निर्माण झाला आहे. धारीवालच्या वढा स्थित पंप हाऊसमधून निघणारी पाईप लाईन वारंवार लिकेज होत असल्यामूळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी देखील फार नुकसान होत आहे. विनापरवानगी व विना मोजनी कंपनीने पाईप लाईन टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याकरीता शासकीय मोजणी काय अ मोजणी करुनच पाईप लाईनची हद्द निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या कंपनीच्या फ्लाय अॅशची वाहतूक करणारी अवजड वाहने चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अस्ताव्यस्त लावण्यात येतात. त्यामुळे आवागमन करणा-या इतर वाहनांना फार त्रास होतो व अपघातांची शक्यता बळावते, यावर त्वरीत प्रतिबंध घालावा, अशी मागणी आहे.
यासर्व बाबींचा मौका चौकशी व प्लॅट भेटी संदर्भात देखीलजिल्हाधिकारी यांना दि. 20.11.2022 व दि. 28.11.2022 ला पत्र व्यवहार करण्यात आला. परंतू अजिबात प्रतिसाद न मिळाल्याने परीसरातील पीडित शेतक-यांसह येत्या ६ डिसेंबर 2022 ला धारीवाल उद्योग बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.