Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ३०, २०२२

विवेक जॉन्सन जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी




राज्यातील ४४ आयएएस अधिका-यांच्या आज बदल्या झाल्या असून, विवेक जॉन्सन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी  रुजू होत आहे. 
(IAS 2018 batch/Maharashtra cadre) (IRS 2016 batch) (Mechanical Engineer) ते मूळचे Malappuram| Kerala येथील आहेत. डॉ. मिताली शेट्टी दीर्घरजेवर गेल्याने त्यांच्या रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली आहे. 

विवेक जॉन्सन हे अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यरत होते. २०२० मध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा, साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा येथे बदलीझाली . कोरोनाच्या काळात २०२१ महदये पांढरकवडा येथे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून विवेक जॉन्सन होते. झरी प्रशासकपदी प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी केळापुर येथे त्यांनी जबाबदारी पार पडली. 

राज्यातील ४४ आयएएस अधिका-यांच्या आज बदल्या झाल्या असून, लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल, नांदेडचे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह जालन्याचे सीईओ मनुज जिंदल, किनटवचे सहायक जिल्हाधिकारी कीर्ती किरन एच पुजार या मराठवाड्यातील आयएएस अधिका-यांचा समावेश आहे. त्यामुळे आता नांदेडचे मनपा आयुक्त म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. भगवंतराव पाटील, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून वर्धा जि. प.चे सीईओ सचिन ओंबसे नाशिकचे सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना यांची जालनाच्या सीईओपदी आणि कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विकास मिना यांची औरंगाबाद जि. प. सीईओपदी बदली झाली, तर नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली झाली आहे.


सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच आज राज्यातील ४४ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून, तर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेंगावकर यांची पुणे येथील बाळासाहेब ठाकरे अ‍ॅग्री बिझनेस आणि ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक पदावर बदली झाली आहे. तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची, तर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. भगवंतराव पाटील यांची नांदेडचे मनपा आयुक्त म्हणून बदली झाली आहे. मात्र, नांदेड मनपा ड वर्गात मोडते. त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पाटील हे पदभार स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिका-यांच्या बदल्याची यादी
(नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण)

१) श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे)
२) विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर)
३) डॉ. रामास्वामी एन. (आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई)
४) अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, नांदेड)
५) डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (प्रधान सचिव, उद्योग विभाग)
६) श्रीमती.जयश्री एस. भोज (डीजीआयपीआर आणि एमडी, महा आयटी कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार)
७) परिमल सिंग (प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.)
८) राजेश नार्वेकर (महापालिका आयुक्त नवी-मुंबई महानगरपालिका)
९) ए.आर.काळे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई)
१०) अभिजीत बांगर (ठाणे महापालिका आयुक्त)
११) डॉ.विपिन शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई)
१२) नीलेश रमेश गटणे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,एसआरए, पुणे.)
१३) सौरभ विजय (सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग)
१४) मिंिलद बोरीकर (मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ)
१५) अविनाश ढाकणे (मॅनेंिजग डायरेक्टर, दादासाहेब फाळके फिल्मनगरी)
१६) संजय खंदारे (प्रधान सचिव -१ सार्वजनिक आरोग्य विभाग)
१७) डॉ. अनबलगन पी.(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी)
१८) दीपक कपूर, (अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग)
१९) श्रीमती. वल्सा नायर (प्रधान सचिव, गृहनिर्माण)
२०) श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर (प्रधान सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार मराठी भाषा विभाग)
२१) मिंिलद म्हैसकर (प्रधान सचिव, नागरी विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई आणि अतिरिक्त प्रभार प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क)
२२) प्रवीणचिंधू दराडे ( सचिव, पर्यावरण विभाग)
२३) तुकाराम मुंढे (आयुक्त एफडब्लू आणि संचालक, एनएचएम, मुंबई)
२४) अनुप कुमार यादव, (सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग)
२५) डॉ. प्रदीप कुमार व्यास (अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग)
२६) डॉ. अश्विनी जोशी (सचिव, वैद्यकीय शिक्षण)
२७) दीपेंद्र सिंह कुशवाह (विकास आयुक्त,उद्योग)
२८) अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे)
२९) श्रीमती श्रद्धा जोशी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी)
३०) मनुज ंिजदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)
३१) सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)
३२) अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)
३३) राजेश पाटील (संचालक, सैनिक कल्याण, पुणे.)
३४) श्रीमती आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)
३५) कीर्ती किरण एच पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी)
३६) रोहन घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा
३७) विकास मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)
३८) श्रीमती वर्षा मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)
३९) के.व्ही.जाधव (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई)
४०) कौस्तुभ दिवेगावकर, (प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे)
४१) एम.देवेंद्र सिंग (जिल्हाधिकारी, रत्नागिरी)
४२) विवेक एल. भीमनवार (परिवहन आयुक्त)
४३) राजेंद्र ंिनबाळकर (व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी)
४४) डॉ. भगवंतराव नामदेव पाटील (महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका)




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.