Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २७, २०२२

Shocking Suicide Chandrapur | चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात धक्कादायक आत्महत्या



शहरातील रामाळा तलावात उडी घेऊन एका ४१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रकाश पोटवार असे मृतकाचे नाव असून, ते वृत्तपत्र क्षेत्रात वितरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रकाश पोटवार हे जिल्हा स्टेडियम जवळ राहत होते. मागील 3 दिवसापासून ते बेपत्ता होते. याची तक्रार मृतकाच्या परिवाराने रामनगर पोलिसात दाखल केली होती. दरम्यान आज मंगळवारी शहरातील रामाळा तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.



Shocking suicide in Ramala lake in Chandrapur city


A shocking incident of a 41-year-old youth committing suicide by jumping into Ramala Lake in the city came to light on Tuesday evening. The name of the deceased is Prakash Potwar, and he was working as a distribution representative in the newspaper sector. The incident was reported to the Ramnagar police. The police reached the spot and conducted a panchnama and took the body out of the water and sent it to the district general hospital for post-mortem.

According to the information received, the deceased Prakash Potwar lived near the district stadium. He was missing for the last 3 days. The family of the deceased filed a complaint with the Ramnagar police. Meanwhile, his dead body was found in the city's Ramala lake on Tuesday. Meanwhile, the exact reason for the suicide could not be known, but the police are investigating in that direction.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.