Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १६, २०२२

Chandrapur local Crime News भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ST डेपोतील तरुण कर्मचाऱ्याची आत्महत्या


Chandrapur Maharashtra News
राजुरा (Rajura) डेपोतील एटीआय टाले ही महिला कर्मचारी आणि चालक व्ही. एल. कोवे हे दोघे पैसे मागत असल्याने आणि प्रचंड मानसिक त्रासाला कंटाळून भगवान अशोक यादव या ३० वर्ष वयाच्या राजुरा (जि. चंद्रपूर) डेपोतील एसटी कर्मचाऱ्याने १५ आगस्टला घरी आत्महत्या केली. घरातील एकमेव कमावता पुरुष गेल्याने आई, भाऊ, पत्नी यांच्यावर दुःख कोसळले आहे. टाले ही महिला कर्मचारी महिन्याला दहा हजार रुपये मागत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. एसटी महामंडळातील अशा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे. तसेच घरातील एकाला महामंडळात नोकरी देण्याची मागणी केली जात आहे. St bus 🚐 


टालेच्या अनेक वेळा तक्रारी
 Chandrapur local Crime News 
टाले नामक महिला कर्मचारी पैसे मागत असल्याच्या अनेक वेळा तक्रारी आहेत. मात्र कुणाचा तरी वरदहस्त असल्याने कुणी पुढे आले नाही. कुणाची भिती वाटत नसल्याने हाताखालील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देण्यात काहीच वाटत नव्हते. अखेर टाले महिला कर्मचाऱ्यांमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टालेकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
मध्यरात्री घेतला गळफास

दररोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय भगवानने घेतला. पत्नी रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. रात्री ११ वाजता मित्रासोबत बोलला. आईने जेवण दिले पण मी रात्री उशिरा जेवण करतो, तू झोप, असे तो म्हणाला. सर्व झोपी गेल्यावर रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला.
 
सकाळी आईने दार ठोठावले पण...
 Chandrapur local Crime News 
स्वातंत्र्य दिन असल्याने आईने नातीला शाळेत सोडले. भगवान अजून ही उठला नाही म्हणून आईने आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने दार लोटले असता आईला दिसलेले दृश्य भयंकर होते. आता तिच्या पोटाचा गोळा या जगात नव्हता.
 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांना जवळ चिठ्ठी सापडली. त्यात माझ्या मृत्यूला टाले कारणीभूत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.

News MH 34 Chandrapur local Crime News  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.