मागील आठ दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर आज महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण आले आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी युतीचे उमेदवार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा भाजपचे जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे आज राज्याच्या २० व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज केवळ शिंदे यांचा शपथविधी होईल, इतर मंत्र्याविषयी नंतर निर्णय घेतला जाईल. आपण स्वतः या सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहे, अस देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माननीय उद्धवजींनी या ठिकाणी राजीनामा दिला त्यानंतर महाराष्ट्राला एक अल्टरनेट गव्हर्मेंट देण्याची आवश्यकता होती. वारंवार गेले अडीच वर्ष मी आपल्याला सांगत होतो, असं सरकार चालत नाही. हे कधी पडेल आणि त्याच वेळेस सांगायचं. आपण विचारायचे मला की सरकार पडलं तर निवडणुका होतील का? पडलं तर आम्ही अल्टरनेट गव्हर्मेंट ठेवून लोकांच्या डोक्यावर निवडणुका आता आम्ही लागणार नाही आणि म्हणून आज एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा विधिमंडळ गट भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ गट आणि सोळा अपक्ष आणि छोटे रजिस्टर पक्षाचे आमदार असा एक मोठा गट हा सोबत आलेला आहे. अजून काही लोक येत आहे. या सगळ्यांचे पत्र आज आम्ही गव्हर्नरला दिले आहे.
भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला. त्यांनी सत्तेच्या पाठीमागे नाही कुठल्यातरी मुख्यमंत्री पदाकरता आम्ही चालत काम करत नाही आहोत. हिंदुत्वाची लढाई विचारांची लढाई आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडेसात वाजता श्री एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी या ठिकाणी होईल. लवकरच पुढची कारवाई करू. मग आम्ही एक्सपान्शन करू. या एक्सपान्शन मध्ये शिवसेनेचे शिंदे साहेबांसोबत असलेले आणि भारतीय जनता पक्षाचे असे मंत्रिमंडळ असेल. मी स्वतः बाहेर असेन.
हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे हे जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार आणि मला अतिशय आनंद आहे हिंदुत्ववादी विचारांचं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेला हिंदुत्व भारतीय जनता पार्टी सातत्याने राजकीय आणि सगळ्यात महत्त्वाचं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे विजन दाखवलाय, ते व्हिजन पुढे नेणार.