Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून २८, २०२२

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्बेतीची महत्वाची अपडेट



Facebook Post Date 28 june
बाबांना काल परत admit केले आहे. आता सर्व visitors ना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. Dinanath Mangeshkar Hospital Pune येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला. 🙏🏻 अनिकेत आमटे



17 जून रात्री 12 वाजता
बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड values ठीक असल्यास लवकरच (8-10 दिवसात) किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा.

DMH दवाखान्यातील अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच, अशी पोस्ट अनिकेत आमटे यांनी केली आहे.



17 जून सकाळी.
बाबांची तब्येत आज बरी आहे. आज कदाचित डिस्चार्ज मिळेल. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. आणि मग सर्व टेस्ट करून किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे, अशी माहिती पुत्र अनिकेत आमटे यांनी आज 17 जून रोजी दिली.


डॉक्टर प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत व पूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला. उपचाराला थोडा प्रतिसाद मिळाला आहे.



📅 Facebook Post Date 16 📅
अनिकेत आमटे यांनी फेसबुक वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, आज पण बाबांच्या #drprakashamte प्रकृती मध्ये चांगली सुधारणा आहे. अतिशय प्रेमाने उपचार करणाऱ्या सर्व तज्ञ डॉक्टर मंडळींचे तसेच हॉस्पिटल स्टाफचे आभार. सर्व जनतेच्या शुभकामना आम्हाला धीर देत असतात.
सर्व ठीक होईल.


Facebook Post Date 15 June
बाबांची #drprakashamte प्रकृती आज कालच्या सारखी स्थिर आहे. औषध उपचाराला प्रतिसाद मिळत आहे. Lukemia हा रोग असल्याने त्याची ट्रीटमेंट बरेच दिवस चालेल. त्यापूर्वी सध्या असलेले निमोनिया चे इन्फेक्शन पूर्ण बरे झाले पाहिजे. आता ताप नाहीये. लवकरच इन्फेक्शन पूर्ण बरे होईल अशी आशा आहे. आपल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभारी आहोत.
अनिकेत आमटे

Dr Prakash Amte, social worker and Magsaysay award winner, has been admitted to a private hospital in Pune.





Prakash Baba Amte is a social worker from Maharashtra, India. Amte and his wife, Mandakini Amte, were awarded the Magsaysay Award for 'Community Leadership' in 2008 for their philanthropic work in the ... Wikipedia
Born: 26 December 1948 (age 73 years), Maharashtra
Spouse: Mandakini Amte
Awards: Padma Shri (2002); Ramon Magsaysay Award (2008)
Education: MBBS Former Surgical Registrar IGMC, Nagpur
Children: Arti Amte, Aniket Amte, Digant Amte
Siblings: Vikas Amte, Renuka Amte-Manohar
Parents: Baba Amte, Sadhana Amte




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.