चंद्रपूर जिल्ह्यातील कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या (officers of Water Conservation Office, Chandrapur ) कामाच्या बिलाची वितरीत केलेल्या बिलाकरिता व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरिता 50 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जलसंधारण कार्यालय चंद्रपूर येथील 2 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर येथे मंगळवारी उशिरा करण्यात आली. दरम्यान या कारवाईत नागपूर च्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, आरोपी त एकूण 3 आरोपीचा समावेश आहे.
बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाच्या बिलाची वितरीत केलेल्या बिलाकरिता व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरिता तक्राराकडून अधिकाऱ्याने 81 लाख रक्कमेची मागणी केली. त्यातील 50 लाख रुपयांची रक्कम स्वीकारतना 3 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीत चंद्रपूर चे प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे, नागपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील, चंद्रपुरातील विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांचा समावेश आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे यांनी केली.
Two officers of Water Conservation Office, Chandrapur have been arrested for accepting a bribe of Rs 50 lakh for the distribution of work bill of Kolhapur dam in Chandrapur district and for disbursement of the remaining amount. The operation was carried out in Nagpur late on Tuesday. Meanwhile, a Nagpur official has been arrested in the operation, which includes a total of three accused.