Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १७, २०२२

उन्हाची तीव्रता वाढली; वाटसरुच्या तृष्णातृप्तीसाठी झोन सभापती छबुताई वैरागडे यांच्या सौजन्याने पाणपोई






चंद्रपूर | उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता वाटसरुंची तृष्णातृप्ती करण्याच्या दृष्टीने जटपुरा प्रभाग 7 मध्ये दि. 16/3/2022 ला ऑटोचालक मालक, पुरुष बचतगट पाण्याची टाकी ऑटोस्टॅड चंद्रपूर येथे झोन सभापती सौ छबुताई मनोज वैरागडे (Zone Chairman Chhabutai Vairagade) यांच्या सौजन्याने पाणपोई लावण्यात आली.  आटो  स्टँड चे अध्यक्ष सुजोत भासरकर यांना वाढदिवसाच्याशुभेच्छा  देवून पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. 

मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, बाहेर फिरणाऱ्या आणि एसटीने ये-जा करणार्‍या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 


यावेळी अध्यक्ष सुजोत भासरकर, उपाध्यक्ष जमीर बाबू खान,  सचिव प्रकाश भैसार, प्रयास पाथाडे, विलास गाऊत्रे, मनोज जीडेवार, बाबाराव राजनकर, राजेंद्र हजारे, नशीय मामु, विशाल राऊत, बबन कांबळे, शामराव दानव, विलास पोटदुखे, प्रशांत वानखेडे, बाळूभाऊ पेटकुले, भीमराव घडसे, विनोद देठे, गौतम रामटेके, गणेश खनके राजुभाऊ मोहूर्ल यांची उपस्थिती होती.

The intensity of the sun increased; Panapoi courtesy of Zone Chairman Chhabutai Vairagade

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.