Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २१, २०२२

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट पर्यंत शोभायात्रा



स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज २१ मार्च रोजी तिथीनुसार जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहात कार्यक्रम घेण्यात आले. पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. जयंतीनिमित्त सर्वत्र ढोल ताशाच्या गजरात 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करीत मिरवणुका काढण्यात आल्या. विविध कार्यक्रम, विविध स्पर्धां व सामाजीक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . या मिरवणुकीत ढोल-ताशा पथकासह कलाकारांनी सहभाग नोंदविला. मिरवणुकीतील विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकीवर भगवे झेंडे लावून तरुणांनी मिरवणूका काढल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सकाळपासूनच मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.