आज दिनांक १०/०२/२०२२ रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा चंद्रपूर तफे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कर्नाटकामधील हिजाब विरोधी आंदोलन महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था विद्यापीठांतून पसरवून सामाजिक सौहार्द बिघडवणारे समाजकंटक यांच्यावर कारवाई करणेबाबत मा. विशाल कुमार मेश्राम अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. आणि यांच्या मार्फत मा. उध्दव ठाकरे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले.
सम्यकयार्थी आंदोलन ही विद्यार्थी संघटना शैक्षणिक
क्षेत्रात विद्यार्थ्याला भेडसावणारे प्रश्न यांसाठी काम करणारी संघटना आहे. देशात विशेषतः ऊत्तरप्रदेशातील निवडणुकीत एका धर्मांध पक्षाला मतदान व्हावे म्हणून कर्नाटक मधील काही कॅालेजमध्ये हिजाब विरोधी आंदोलन करून शिक्षणाला हिंदू-मुस्लिम करणेचा प्रयत्न चालू आहे. अल्पसंख्यांकांच्या वर्गाला टार्गेट करून त्यांच्या जीवन पध्दतीवर हल्ले करणेचा प्रयत्न काही धर्मांध शक्ती कडून केला जात आहे.
मुस्लिम समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.त्यांची शैक्षणिक स्थिती SC/ST वर्गापेक्षा कमी आहे.अशा स्थितीत गरिब मुस्लिम पालक आपल्या मुलींना अल्पसंख्यांकांच्या संस्था असतील किंवा ईतर धर्मियांनी संस्थांनी चालविलेल्या संस्था असतील त्या ठिकाणी यामुली शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जीवीताचे त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करणेचे काम आपण जिल्हाधिकारी वडील म्हणून आपले आहे. म्हणून जिल्ह्यातील शैक्षणिक संकुलातील वातावरण दूषित होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाशी बोलून जिल्हयात शांतता व सौहार्द राहील याची चोख व्यवस्था ठेवणे आपले परमकर्तव्य आहे.
केरळ सारख्या राज्यांत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम भगिनी त्यांच्या हिजाबमध्ये शिक्षण घेत असताना आंदोलन भाजपशाशित राज्यातून सुरू होऊन ईतर राज्यांत जाणीवपूर्वक पसरविले जात आहे. त्याला राज्यांच्या सीमेवर थांबविणे आपले शासन म्हणून काम आहे. ते आपण कराल आणि राज्यातील शांतता भंग होणार नाही ,याची काळजी घ्याल ही विनंती करून निवेदन देण्यात आले
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष धिरज तेलंग यांच्या नेतृत्वात या मागणीचे निवेदन देण्यात आले त्यावेळी सम्यकचे प्रशांत कांबळे, नरेश आलम नागराज कांबळे , मयुर डांगे, अॅड. क्षितिज मेंढे, कबीर रामटेके, प्रफुल वासनिक इत्यादी यांची उपस्थिती होती
Statement to District Collector on behalf of Samyak Andolan Vidyarthi Sanghatana