Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १०, २०२२

सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन च्या बाररूम चे उद्घाटन #chandrapur

मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन च्या बाररूम चे उद्घाटन.....



दिनांक १०/०२/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर येथे वकिलांच्या बैठकीच्या रूम चे उद्घाटन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी. अग्रवाल मॅडम यांच्या हस्ते मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त ,चंद्रपूर श्रीमती. ढबाले मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 यावेळेस असोसिएशन चे अध्यक्ष ऍड श्री अभय पाचपोर,उपाध्यक्ष श्री राजेश ठाकूर,सचिव श्री आशिष धर्मपुरीवार,सहसचिव ऍड विनायक कार्लेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी. अग्रवाल मॅडम यांनी व मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त ,चंद्रपूर श्रीमती. ढबाले मॅडम यांनी बार व बेंच मधील संबंध सुदृढ होईल असे प्रांजळ मत याप्रसंगी मांडले. असोसिएशन चे अध्यक्ष यांनी मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त ,चंद्रपूर श्रीमती. ढबाले मॅडम यांचे जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल मनस्वी आभार मानले.


या कार्यक्रमाचे संचालन ऍड ढोक यांनी तर आभार प्रदर्शन ऍड श्री काकडे यांनी केले. मागील २० वर्षांपासूनची मागणी चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनची यावर्षी निवडून आलेल्या कार्यकारिणी यांच्या प्रयत्नामुळे आज पूर्ण झाली असे मत ऍड टिकले यांनी यावेळेस मांडले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ऍड ढोक, ऍड काकडे, ऍड प्रवीण कौरासे,ऍड आशिष पिपरोडे, ऍड रितेश सिंघवी, ऍड राजेश खोब्रागडे ,ऍड जयश्री मोगरे,ऍड राकेश रंगारी,ऍड शेषराव रंगारी, ऍड मांगे, ऍड खडतकर,ऍड आशिष मुंधडा, ऍड बोरीकर,ऍड रशीद शेख, ऍड राहुल मेंढे यांनी व सहाय्यक धर्मदाय आयुक्त ,चंद्रपूर येथील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.