Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १०, २०२२

29वें झाडीबोली साहित्य संमेलन मूल तालुक्यातील जूनासुरला येथे होणार #Chandrapur zadiboli sammelan



29वें झाडीबोली साहित्य संमेलन मूल तालुक्यातील जूनासुरला येथे होणार


२९ वे झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला , ता. मूल ,जि. चंद्रपूर येथे होणार असून ; त्या नियोजन संदर्भात आज दिनांक १०/०२/२०२२ गुरुवारला दुपारी १:०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनासुर्ला येथे स्वागताध्यक्ष रंजित समर्थ ,सरपंच यांचे अध्यक्षतेखाली माननीय किशोर आनंदवार सर यांच्या मार्गदर्शनात जुनासुर्लावासीय ग्रामस्थांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली . सभेत उत्साहपूर्ण वातावरणात खालील विषयावर चर्चा करून ठराव घेण्यात आले .
१) २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन १२ व १३ मार्च २०२२ ला होणार असून ,त्यापूर्वी ग्रामस्वच्छता अभियान स्वयंस्फूर्तीने राबवायचे ठरले . गावभर रोषणाई आणि पताकांनी गाव सजवून दोन दिवसीय सण साजरा करण्याचे ठरले .
२) संमेलनाचे यशस्वीतेसाठी सर्व तपशीलवार बाबीसाठी समित्या नेमण्यात येऊन ,यात कोणतीही कुचराई होणार नाही यासाठी साधकबाधक चर्चा करण्यात आली .
३) ग्रंथदिंडीवेळी गावातील परंपरेचे दर्शन घडविणारी शोभायात्रा निघावी यासाठी वेशभूषापासून कलेचे सादरीकरण आणि ग्रंथदिंडीचा मार्ग ठरविण्यात आला .
४) संमेलनात परिसरातील लोककला सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली . गावातील कलावंताचे नाव सुचवून परिसरातील कलावंतांचा शोध घेण्याचे ठरले .
५) पेंडाल , भोजन , निवास ,बॅनर , पत्रिका , सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र , ग्रंथदिंडी यासह अनेक बाबींवर चर्चा करून सामूहिक जबाबदारी पेलण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला .
६) माननीय गणेश खोब्रागडे, कार्याध्यक्ष झाडीबोली साहित्य संमेलन यांनी संमेलनाचे स्वरूप व आयोजनाचे उद्दिष्ट प्रस्ताविकातून स्पष्ट केले . गावकऱ्यांनी मिळालेल्या मानाचे चीज व्हावे म्हणून कोणतीही कमतरता राहणार नाही , यासाठी चंग बांधल्याचे दिसून आले .
७)उपसरपंच खुशाल टेकाम ,सहकार्याध्यक्ष झाडीबोली साहित्य संमेलन यांनी परिसरातील गावांशी संपर्क साधून अधिकाधिक लोकांना संमेलनाचा कसा फायदा होईल , यासाठी प्रचारकार्यक्रमावर सकारात्मक चर्चा घडवून आणली .
८) जुनासुर्लावासीय जनतेने संमेलन यशस्वी करण्याची हमी देऊन , आयोजनाची संधी दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानले .
९) सरतेशेवटी माननीय किशोर आनंदवार यांनी गावात नवा इतिहास लिहिल्या जाणार याचा सार्थ अभिमान व्यक्त केला .
सभेचे संचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले . उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्य राजेश यांनी मानले. यावेळी सर्व माननीय श्री . विनायक पा. बुग्गावार , विलासभाऊ कलसार , शंकर पाटेवार , डॉ. सुरेश पेशट्टीवार , किशोर उपरिकार , उमाजी आत्राम , महादेवजी शेडमाके , वैभव मडावी , प्रज्वल गौरकार , आकाश कोरेवार , बाळूभाऊ गोवर्धन , मोतीराम पा. उपरिकार , विलासजी भंडारे , शंकरजी शेंडे , मारोती पा. उपरिकार , रतनभाऊ उराडे , तुळशीराम पा. उपरिकार , रामभाऊ सिडाम , डॉ. विजय चिटमलवार , मारोती पा. खोब्रागडे , रामुजी कोरिवार , प्रकाश पा. बुग्गावार , किशोर सुरेवार , निलेश खोब्रागडे , विनायकभाऊ पेरकिवार , मुकुंदाजी मोटघरे , अरविंदभाऊ लोडेल्लीवार , सोमनाथ शेडमाके आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .

🙏 *वृत्तांकन*🙏
लक्ष्मण खोब्रागडे , जुनासुर्ला
९८३४९०३५५१

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.